पैठण : सोन्याच्या दागिन्याच्या बदल्यात जास्त पैशाचे अमिष देऊन वृद्ध महिलेला गंडा
पैठण; Bharat Live News Media वृत्तसेवा : पैठण शहरातील एका हायस्कूल समोर अज्ञात दोन भामट्यांनी ६० वर्षे वयोवृद्ध महिलेला सोन्याच्या दागिन्याच्या बदल्यात जास्त पैशाचे अमिष देऊन ६२ हजारांचे दागिने लंपास केल्याची घटना समोर आली. सोमवारी (दि.१) दुपारी ही घटना घडली. याप्रकरणी पैठण पोलिसांनी दोन अज्ञात चोरट्याविरुद्ध गुरुवारी (दि.४) तक्रार उशिरा दिल्याने गुन्हा दाखल केला.
अधिक माहिती अशी की, पैठण शहरातील एका हायस्कूल समोर सोमवार (दि. ४) काही कामानिमित्त पैठण शहरात आलेल्या शांताबाई रभाजी सबलस (वय ६० रा. मुंगी ता. शेवगाव जि अहमदनगर) ही वयोवृद्ध महिला रस्त्यालगत उभा असताना अज्ञात दोन भामट्याने अंगावरील असलेल्या सोन्याच्या बदल्यात जास्त पैशाची अमिष दिले. जास्त पैसे मिळत असल्याने सदर महिलेने आपल्या अंगावरील सोन्याचे दागिने असे एकूण ६२ हजार ५०० रुपयाचे दागिने मुद्दामाल फसवणूक करून लंपास केल्याची तक्रार सदरील महिलेने गुरुवारी (दि.४) पोलीस ठाण्यात दाखल केली. पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांनी अज्ञात दोन भामट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस जमादार महेश माळी हे करीत आहे.
Latest Marathi News पैठण : सोन्याच्या दागिन्याच्या बदल्यात जास्त पैशाचे अमिष देऊन वृद्ध महिलेला गंडा Brought to You By : Bharat Live News Media.