चीनी एव्हिएन इन्फ्लुएन्झावर भारत सरकारचे बारकाईने लक्ष

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : कोरोना महामारीच्या उपद्रवानंतर चीनध्ये आता एच 9 एन 2 या एव्हिएन इन्फ्लुएन्झा विषाणूने थैमान घातले आहे. त्यामुळे जगभरात चिंतेचे वातावरण आहे. भारताची चिंता वाढली आहे. दरम्यान, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आज (24 नोव्हेंबर) यासंदर्भात निवेदन जारी करून चीनी मुलांमध्ये पसरणाऱ्या श्वसनविकाराकडे बारकाईने लक्ष असल्याचे स्पष्ट केले. या आजाराचा भारताला फारसा धोका … The post चीनी एव्हिएन इन्फ्लुएन्झावर भारत सरकारचे बारकाईने लक्ष appeared first on पुढारी.
#image_title

चीनी एव्हिएन इन्फ्लुएन्झावर भारत सरकारचे बारकाईने लक्ष

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : कोरोना महामारीच्या उपद्रवानंतर चीनध्ये आता एच 9 एन 2 या एव्हिएन इन्फ्लुएन्झा विषाणूने थैमान घातले आहे. त्यामुळे जगभरात चिंतेचे वातावरण आहे. भारताची चिंता वाढली आहे. दरम्यान, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आज (24 नोव्हेंबर) यासंदर्भात निवेदन जारी करून चीनी मुलांमध्ये पसरणाऱ्या श्वसनविकाराकडे बारकाईने लक्ष असल्याचे स्पष्ट केले. या आजाराचा भारताला फारसा धोका नाही. मात्र यामुळे उद्भवणाऱ्या कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी सरकार सज्ज असल्याचे देखील आरोग्य मंत्रालयाने सांगितले.
आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या या निवेदनात म्हटले आहे की, चीनमधील एव्हीयन इन्फ्लूएन्झाचा (एच 9 एन 2) प्रादुर्भाव आणि लहान मुलांमधील वाढत्या श्वसन आजारावर सरकार लक्ष ठेवून आहे. या दोन्हीही गोष्टींपासून भारताला धोका कमी आहे. परंतु, विद्यमान परिस्थितीमुळे उद्भवू शकणाऱ्या कोणत्याही संकटाचा सामना करण्यासाठी भारत सज्ज असल्याचेही आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.
माध्यमांध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्ताचा दाखला देत आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे की, गेल्या काही आठवड्यांत चीनमध्ये श्वसनाच्या आजारांच्या घटनांमध्ये वाढ नोंदवण्यात आली आहे. त्यात चीनच्या उत्तर भागात लहान मुलांमध्ये श्वसन विकार वाढल्याचे आढळून आले आहे. याबाबत जागतिक आरोग्य संघटनेने देखील निवेदन जारी केले आहे. चीनमध्ये ऑक्टोबर महिन्यात एव्हियन इन्फ्लूएन्झा विषाणूचा संसर्ग एका व्यक्तीला झाल्याचे आढळून आल्यानंतर एव्हीयन इन्फ्लूएन्झाच्या मानवी प्रकरणांविरूद्धच्या तयारीबाबत चर्चा करण्यासाठी आरोग्य सेवा महासंचालनालयाच्या अध्यक्षतेखाली नुकतीच एक बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीचा अहवाल जागतिक आरोग्य संघटनेला देण्यात आला होता. आरोग्य संघटनेने केलेल्या जोखीम मूल्यमापनाच्या आधारे म्हटले आहे की, आतापर्यंत नोंदवलेल्या एव्हियन इन्फ्लूएन्झाच्या प्रकरणांमध्ये एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला संसर्ग पसरण्याची शक्यता कमी असून मृत्यूचे प्रमाणही अत्यल्प आढळले आहे. तरी देखील भारत कोणत्याही प्रकारच्या सार्वजनिक आरोग्य संकटाची स्थिती हाताळण्यासाठी तयार आहे. अशा सार्वजनिक आरोग्य समस्यांचा सामना करण्यासाठी समग्र आणि एकात्मिक कृती आराखडा स्वीकारण्यासाठी सरकार प्रगतिपथावर असल्याचेही आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.
दरम्यान, जागतिक आरोग्य संघटनेने उत्तर चीनमधील मुलांमध्ये श्वसनाच्या आजारात वाढ झाल्याच्या पार्श्वभूमीवर याबाबतच्या आकडेवारीचे अध्ययन चालविले असून चीनने यासंदर्भातील सर्व माहितीचे आदानप्रदान करावे असे आवाहन देखील केले आहे. जागतिक आरोग्य संघटनेने या आजाराविरूद्धच्या उपाययोजनांचे पालन करण्यासाठी चीनला सूचना दिल्या असून रुग्णांना एकांतवासात ठेवणे, आजारी असल्यास घरीच थांबणे, मास्क वापरणे यासारख्या मार्गदर्शक सूचनाही जारी केल्या आहेत.
The post चीनी एव्हिएन इन्फ्लुएन्झावर भारत सरकारचे बारकाईने लक्ष appeared first on पुढारी.

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : कोरोना महामारीच्या उपद्रवानंतर चीनध्ये आता एच 9 एन 2 या एव्हिएन इन्फ्लुएन्झा विषाणूने थैमान घातले आहे. त्यामुळे जगभरात चिंतेचे वातावरण आहे. भारताची चिंता वाढली आहे. दरम्यान, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आज (24 नोव्हेंबर) यासंदर्भात निवेदन जारी करून चीनी मुलांमध्ये पसरणाऱ्या श्वसनविकाराकडे बारकाईने लक्ष असल्याचे स्पष्ट केले. या आजाराचा भारताला फारसा धोका …

The post चीनी एव्हिएन इन्फ्लुएन्झावर भारत सरकारचे बारकाईने लक्ष appeared first on पुढारी.

Go to Source