राहुल गांधी आईच्‍या महत्त्वाकांक्षेचे बळी : कंगना रणौत यांची बोचरी टीका

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : काँग्रेस नेते राहुल गांधी हे आईच्‍या महत्त्‍वाकांक्षेचे बळी आहेत. राहुल गांधी अणि त्‍यांची बहीण प्रियंका या दोघांनाही सोनिया गांधी यांनी दबाव आणि जबरदस्‍तीने राजकारणात आणले आहे, अशी बोचरी टीका अभिनेत्री आणि हिमाचल प्रदेशच्या मंडीतील भाजपच्या लोकसभा उमेदवार कंगना रणौत यांनी ‘इंडिया टुडे’ ला दिलेल्या मुलाखतीवेळी केली. ‘थ्री इडियट्स’ चित्रपटाप्रमाणे कंनगा रणौत … The post राहुल गांधी आईच्‍या महत्त्वाकांक्षेचे बळी : कंगना रणौत यांची बोचरी टीका appeared first on पुढारी.

राहुल गांधी आईच्‍या महत्त्वाकांक्षेचे बळी : कंगना रणौत यांची बोचरी टीका

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्‍क : काँग्रेस नेते राहुल गांधी हे आईच्‍या महत्त्‍वाकांक्षेचे बळी आहेत. राहुल गांधी अणि त्‍यांची बहीण प्रियंका या दोघांनाही सोनिया गांधी यांनी दबाव आणि जबरदस्‍तीने राजकारणात आणले आहे, अशी बोचरी टीका अभिनेत्री आणि हिमाचल प्रदेशच्या मंडीतील भाजपच्या लोकसभा उमेदवार कंगना रणौत यांनी ‘इंडिया टुडे’ ला दिलेल्या मुलाखतीवेळी केली.
‘थ्री इडियट्स’ चित्रपटाप्रमाणे
कंनगा रणौत यांनी मुलाखतीमध्‍ये सांगितले की, राहुल गांधी हे आईच्‍या राजकीय महत्त्‍वाकांक्षेला बळी पडले आहेत. तुम्‍ही थ्री इंडियट्‍स हा चित्रपट पाहिला आहे का? यामध्‍ये मुलं ही घराणेशाहीचे बळी कसे पडतात हे दाखवलं आहे. राहुल गांधी यांचीही परिस्‍थिती तशीच आहे. राहुल आणि प्रियंका गांधी या दोघांनीही राजकारणातच राहावे, यासाठी त्यांच्या आईकडून राजकारणात राहण्यासाठी दबाव आणला गेला. या दोघांनाही त्‍याच्‍या मनाप्रमाणे जीनव जगण्‍याची परवानगी द्यायला हवी होती, असेही त्‍या म्‍हणाल्‍या.
वय ५० पेक्षा अधिक;मग युवा नेते कसे?
राहुल गांधी यांचे वय ५० पेक्षा अधिक आहे. तरीही नेहमी त्‍यांना युवा नेता म्हणून ‘लॉन्च’ केले जाते. मला वाटते की त्याच्यावर राजकारणात राहणयासाठी दबाव आणला जात आहे. ते खूप एकाकी आहेत, असा दावाही कंगना यांनी यावेळी केला.
राहुल गांधी चांगले अभिनेते बनू शकले असते
काँग्रेसच्या वंशजांना इतर काही व्यवसाय करण्याची परवानगी द्यायला हवी होती. राहुल गांधींनी काहीतरी वेगळं करायला हवं होतं त्‍यांनी अभिनयात करीअर करण्‍याचा प्रयत्‍न करायला हावा होता. ते एक चांगले अभिनेते बनू शकले असते. त्याची आई जगातील सर्वात श्रीमंत महिलांपैकी एक आहे. त्यांच्याकडे संपत्तीची कमी नाही, असा टोलाही त्‍यांनी लगावला.
हेही वाचा : 

Lok Sabha election 2024 : म्युच्युअल फंडमध्‍ये ३.८१ कोटींची गुंतवणूक, राहुल गांधींच्‍या नावावर एकुण मालमत्ता किती?
Lok Sabha elections 2024 : भ्रष्टाचार्‍यांना पक्षात घेऊन पंतप्रधान भ्रष्टाचाराशी कसे लढणार : संजय राऊत

 
 
Latest Marathi News राहुल गांधी आईच्‍या महत्त्वाकांक्षेचे बळी : कंगना रणौत यांची बोचरी टीका Brought to You By : Bharat Live News Media.