आखाडा बाळापुरात आमदार बांगर यांना दाखविले काळे झेंडे
आखाडा बाळापूर; पुढारी वृत्तसेवा : कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापूर येथे आज (दि.24) एका कार्यक्रमासाठी आमदार संतोष बांगर आखाडा बाळापूर येथे आले होते. कार्यक्रम उरकून जात असताना त्यांना सकल मराठा समाजाच्या वतीने काळे झेंडे दाखवण्यात आले.
पेंढारकर यांच्या वडिलांच्या पुण्यतिथीनिमित्त आमदार संतोष बांगर आखाडा बाळापूर येथे आले होते. या ठिकाणी भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन केले होते. हा कार्यक्रम आटोपून दुपारी तीनच्या सुमारास परत जात असताना शेवाळा रोडवर सकल मराठा समाजाच्या दहा ते पंधरा कार्यकर्त्यांनी आमदार संतोष बांगर यांना ओबीसीला समर्थन करता आणि मराठा आरक्षणाला विरोध का करता असा जाब विचारण्यासाठी काळे झेंडे दाखविले. यावेळी आमदार संतोष बांगर तिथून कोणतीही प्रतिक्रिया न देता निघून गेले.
हेही वाचा :
Indian Idol 14 हा प्रत्येकाला अभिमान वाटावा असा शो-रणबीर कपूर
छ. संभाजीनगर : पोलीस बंदोबस्तात नाथसागर धरणात पाणी सोडण्याची कार्यवाही सुरू
अदिती राव हैदरीला प्रतिष्ठित DIAFA सन्मान
The post आखाडा बाळापुरात आमदार बांगर यांना दाखविले काळे झेंडे appeared first on पुढारी.
आखाडा बाळापूर; पुढारी वृत्तसेवा : कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापूर येथे आज (दि.24) एका कार्यक्रमासाठी आमदार संतोष बांगर आखाडा बाळापूर येथे आले होते. कार्यक्रम उरकून जात असताना त्यांना सकल मराठा समाजाच्या वतीने काळे झेंडे दाखवण्यात आले. पेंढारकर यांच्या वडिलांच्या पुण्यतिथीनिमित्त आमदार संतोष बांगर आखाडा बाळापूर येथे आले होते. या ठिकाणी भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन केले होते. हा …
The post आखाडा बाळापुरात आमदार बांगर यांना दाखविले काळे झेंडे appeared first on पुढारी.