इंदुरीकर महाराज यांना अखेर जामीन मंजूर

संगमनेरः पुढारी वृत्तसेवा :  आपल्या कीर्तनामधून आपत्यप्राप्ती बाबतचे वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी विवादात सापडलेले महाराष्ट्रातील थोर समाज प्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर यांना संगमनेर येथील प्रथम वर्ग न्यायालयाने आज गुरुवारी 20हजार रुपयांच्या जात मचुल्यावर जामीन अर्ज मंजूर करत दिलासा दिला आहे. निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर यांनी अपत्य प्राप्तीबाबत केलेल्या विधानाच्या विरोधात अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या अ‍ॅड. रंजना … The post इंदुरीकर महाराज यांना अखेर जामीन मंजूर appeared first on पुढारी.
#image_title

इंदुरीकर महाराज यांना अखेर जामीन मंजूर

संगमनेरः पुढारी वृत्तसेवा :  आपल्या कीर्तनामधून आपत्यप्राप्ती बाबतचे वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी विवादात सापडलेले महाराष्ट्रातील थोर समाज प्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर यांना संगमनेर येथील प्रथम वर्ग न्यायालयाने आज गुरुवारी 20हजार रुपयांच्या जात मचुल्यावर जामीन अर्ज मंजूर करत दिलासा दिला आहे. निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर यांनी अपत्य प्राप्तीबाबत केलेल्या विधानाच्या विरोधात अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या अ‍ॅड. रंजना गवांदे यांनी गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर अतिरिक्त जिल्हा न्यायालय इंदुरीकर महाराजांना जामीन मंजूर केला. उच्च न्यायालयानेही जिल्हा न्यायालयाचा निकाल अंतिम ठेवला.
यानंतर अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या अ‍ॅड. गवांदे यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. सर्वोच्च न्यायालयानेहाखटला पुन्हा प्रथम वर्ग न्यायालयात चालू करावा, असे आदेश दिले. त्यानंतर पुन्हा नव्याने संगमनेरच्या प्रथम वर्गात न्यायालयात हा खटला सुरू झाला.
या प्रकरणी दोनवेळा त्यांना न्यायालयात हजर राहण्याचे समन्स बजाविण्यात आले होते. मात्र दोन्हीवेळा ते न्यायलयात हजर राहू शकले नाहीत. त्यामुळे निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांचे वकील अ‍ॅड. के. डी. धुमाळ यांनी इंदुरीकर महाराज यांना जामीन मिळण्यासाठी 11 नोव्हेंबरला जामीन अर्ज दाखल केला होता. मात्र त्या दिवशी इंदुरीकर महाराज उपस्थित न राहिल्याने न्यायालयाने त्या जामीन अर्जावर शुक्रवारी (ता. 24) रोजी सुनावणी ठेवली होती. या सुनावणीवेळी ते गैरहजर राहीले तर इंदुरीकर महाराजांच्या नावाने अटक वॉरंट निघण्याची दाट शक्यता होती. त्यामुळे या तारखेकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून होते.
प्रसारमाध्यमांना कुठल्याही प्रकारची माहिती न मिळता इंदुरीकर महाराज सुना वणीच्या आदल्या दिवशी गुरुवारी सकाळी 11 वाजता न्यायालयात हजर झाले आणि इंदुरीकर महाराजांचे वकील धुमाळ यांनी प्रथम वर्ग न्यायालयाचे न्यायाधीश एस. एस. वाघमारे यांच्याकडे जामीन अर्ज दाखल केला. न्यायाधीश वाघमारे यांनी इंदुरीकर महाराज यांचा जामीन मंजूर केलेला आहे.
हेही वाचा :

BMC : मुंबई महापालिकेतर्फे कोविडच्या काळात ४१५० कोटींचा खर्च: माहिती अधिकारात आकडेवारी जाहीर
Crime news : मित्राच्या बायकोला फोन करतो म्हणून तरूणावर गोळीबार

The post इंदुरीकर महाराज यांना अखेर जामीन मंजूर appeared first on पुढारी.

संगमनेरः पुढारी वृत्तसेवा :  आपल्या कीर्तनामधून आपत्यप्राप्ती बाबतचे वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी विवादात सापडलेले महाराष्ट्रातील थोर समाज प्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर यांना संगमनेर येथील प्रथम वर्ग न्यायालयाने आज गुरुवारी 20हजार रुपयांच्या जात मचुल्यावर जामीन अर्ज मंजूर करत दिलासा दिला आहे. निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर यांनी अपत्य प्राप्तीबाबत केलेल्या विधानाच्या विरोधात अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या अ‍ॅड. रंजना …

The post इंदुरीकर महाराज यांना अखेर जामीन मंजूर appeared first on पुढारी.

Go to Source