द्राक्षासंदर्भात चुकीचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने शेतकऱ्यांना फटका, कारवाईची मागणी
चांदवड (जि. नाशिक) : Bharat Live News Media वृत्तसेवा- चालूवर्षी द्राक्ष बागांना बाजारभाव नसल्याने शेतकऱ्यांनी मिळेल त्या दराने द्राक्ष विक्री केले आहेत. यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागला आहे. अशातच आता काही खोडशाळ तरुणांनी सोशल मीडियावर द्राक्षा संदर्भात चुकीच्या पद्धतीने खोटे व्हिडिओ शेअर केल्याने त्याचा थेट द्राक्ष मालाच्या विक्रीवर परिणाम झाला आहे. हा खोटा व्हिडिओ प्रसारित करणाऱ्यांवर तत्काळ कारवाई करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी समस्त द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी निवेदनाव्दारे वडनेरभैरव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनकर मुंडे यांच्याकडे केली आहे. (Nashik Grapes News)
सध्या द्राक्ष हंगाम अंतिम टप्प्यात असून गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या माध्यमांतून अर्धवट अशा व्हिडिओचा वापर करत काही युट्युबवर द्राक्ष पिकाबद्दल शहरी भागात खोट्या अफवा पसरविल्या आहे. यामुळे ग्राहकांमध्ये प्रचंड संभ्रमावस्था निर्माण झाली असल्याने त्याचा व्यापारी वर्ग व शेतकरी यांच्या मालावर थेट परिणाम झाला आहे. आधीच द्राक्ष पिकाला बाजारभाव नसल्याने कवडीमोल दराने द्राक्ष विक्री करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. त्यात काही तरुणांनी द्राक्ष पिकाबद्दल चुकीचे व्हिडीओ प्रसारित केल्याने सर्वसामान्य नागरिकात भीती निर्माण झाली आहे. याचा थेट फटका द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे. अजून ३० ते ४० टक्के द्राक्ष बागा खाली होणे शिल्लक आहे. अशातच हा चुकीचा व्हिडीओ सोशल मिडीयावर प्रसारित झाल्याने द्राक्ष बागा खरेदी करण्यास धजावत आहेत. पहिलेच भाव नसल्याने द्राक्ष बागा मिळेल त्या दराने विक्री केल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. आज पुन्हा चुकीचा व्हिडीओ शेअर केल्याने त्यांचा आणखीन फटका द्राक्ष उत्पादकांना बसत आहे. (Nashik Grapes News)
चुकीचा व्हिडीओ शेअर करणारे परराज्यातील (Nashik Grapes News)
परराज्यातील दोन युवकांनी द्राक्षाचा चुकीचा व्हिडीओ शेअर केल्याचे समोर आले असून त्यांची नावे पोलीसांना देण्यात आली आहे. इतरांचाही शोध घेऊन त्यांच्यावर कारवाईची मागणी द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे.
वडनेरभैरव पोलीस ठाण्यात द्राक्षा बाबत चुकीचे व्हिडिओ प्रसारित करणाऱ्या वर कारवाईची निवेदन देताना सरपंच सुनील पाचोरकर व किशोर मोहिते उपसरपंच योगेश साळुंखे, द्राक्ष उत्पादक शेतकरी अमोल माळी, प्रमोद निकम, शशिकांत वक्ते,सुभाष पुरकर बाळासाहेब शिंदे, संदीप वक्ते आदी.
यावेळी वडनेरभैरव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पी. व्ही. तागड यांना निवेदन देण्यात आले. निवेदनावर सरपंच सुनील पाचोरकर, उपसरपंच योगेश साळुंखे, द्राक्ष उत्पादक शेतकरी अमोल माळी, प्रमोद निकम, किशोर मोहिते, शशिकांत वक्ते, सुभाष पुरकर, बाळासाहेब शिंदे, संदीप वक्ते यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
हेही वाचा :
Gudi Padwa Special : जाणून घ्या गुढी उभारण्याचे महत्त्व आणि धार्मिक विधी
सिंधुदुर्ग-रत्नागिरी मतदारसंघ सोडणार नाही : नारायण राणे
कॉंग्रेसने जात प्रमाणपत्र सदोष असूनही रश्मी बर्वेंना उमेदवारी का दिली? मनीषा कायंदे यांचा सवाल
Latest Marathi News द्राक्षासंदर्भात चुकीचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने शेतकऱ्यांना फटका, कारवाईची मागणी Brought to You By : Bharat Live News Media.