गुढीपाडवा विशेष : जाणून घ्या गुढी उभारण्याचे महत्त्व आणि धार्मिक विधी

पुढारी ऑनलाईन :  चैत्र शुद्ध प्रतिपदेसच गुढीपाडवा म्हणतात. हा हिंदू सणांतील अत्यंत महत्त्वाचा सण आहे. या वर्षी ९ एप्रिलला मंगळवारी गुढीपाडवा आहे. यानिमित्ताने गुढी कशी उभी करावी, पूजा कशी करावी याबद्दची शास्त्रीय माहिती आपण पाहणार आहोत. ( Gudi Padwa Special ) संबंधित बातम्या  Kolhapur Lok Sabha 2024 | हातकणंगले मतदारसंघ : तिकिट जाहीर झाल्यानंतर सत्यजित … The post गुढीपाडवा विशेष : जाणून घ्या गुढी उभारण्याचे महत्त्व आणि धार्मिक विधी appeared first on पुढारी.

गुढीपाडवा विशेष : जाणून घ्या गुढी उभारण्याचे महत्त्व आणि धार्मिक विधी

Bharat Live News Media ऑनलाईन :  चैत्र शुद्ध प्रतिपदेसच गुढीपाडवा म्हणतात. हा हिंदू सणांतील अत्यंत महत्त्वाचा सण आहे. या वर्षी ९ एप्रिलला मंगळवारी गुढीपाडवा आहे. यानिमित्ताने गुढी कशी उभी करावी, पूजा कशी करावी याबद्दची शास्त्रीय माहिती आपण पाहणार आहोत. ( Gudi Padwa Special )
संबंधित बातम्या 

Kolhapur Lok Sabha 2024 | हातकणंगले मतदारसंघ : तिकिट जाहीर झाल्यानंतर सत्यजित पाटील सरूडकर समर्थकांचा जल्लोष!
Weather News | निवडणुकीच्या रणधुमाळीत शुक्रवारपासून अवकाळी पावसाची शक्यता
धनुष्यबाण चिन्हावर लढण्याची कधीही ऑफर नव्हती : संजीव नाईक

गुढी कशी उभी करावी?
गुढी पाडव्याच्या दिवशी सूर्योदयावेळी गुढी उभी केली जाते. हा अत्यंत महत्त्वाचा विधी आहे. यासाठी वेळूच्या काठीला तेल लावून गरम पाण्याने स्नान घातले जाते. या काठीला हळदी कुंकू लावून नंतर निमुळत्या टोकावर केशरी रंगाचे वस्त्र घडी करून सोबत कडुलिंबाचा डाळी, चाफ्याच्या फुलांची माळ, साखरगाठीची माळ एका सूत्राने बांधतात. या गुढीवर कलशासारखे पात्र उपडे ठेवावे. गुढी घराच्या दाराजवळ उभी करावी आणि गुढीच्या खाली एक पाट ठेवावे.
पूजा विधी
गुढी उभी केल्यानंतर दुपारी ब्रह्मध्वजाय नमः । या मंत्राने पंचोपचार पूजा केल्यावर “ब्रह्मध्वज नमस्तेऽस्तु सर्वाभीष्टफलप्रद । प्राप्तेऽस्मिन्वत्सरे नित्यं मट्टहे मङ्गलं कुरु ।।’ अशी प्रार्थना करावी.
गुढी उभारल्यानंतर पंचांग घेऊन त्याच्या मुखपृष्ठावरील गणपतीचे पंचोपचार पूजन करून पंचांगातील संवत्सरफले गुरूजींकडून श्रवण करावीत किंवा स्वतः वाचावीत. गुढीपाडव्याच्या दिवशी जेवणात हिंग, मीठ, मिरे, ओवा व साखर यांचे मिश्रण करून त्यात कडुनिंबाचा मोहर व कोवळी पाने घालून ते मिश्रण चांगले वाटून घ्यावे. जेवणावेळी वेळी हे मिश्रण सर्वांना वाढावे.
गुढी उतरवण्याचा विधी
सूर्यास्तसमयी गुढीस हळद‌कुंकू लावून दूधसाखरेचा नैवेद्य दाखवावा व गुढी खाली उतरावी.
साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त
गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त आहे. ज्या घरात एखाद्या व्यक्तीचे निधन झाले असेल त्या घरात त्या वर्षी गुढी न उभारण्याची प्रथा आहे. ( Gudi Padwa Special )
(संदर्भ – हिंदू धर्मातील व्रतवैकल्ये, वेदवाणी प्रकाशन)
 
Latest Marathi News गुढीपाडवा विशेष : जाणून घ्या गुढी उभारण्याचे महत्त्व आणि धार्मिक विधी Brought to You By : Bharat Live News Media.