सेन्सेक्स, निफ्टी सपाट, realty ला फटका, IT तेजीत
Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : कमकुवत जागतिक संकेत आणि यूएस ट्रेझरी बाँडमध्ये वाढ यामुळे गुंतवणूकदारांनी सावध भूमिका घेतली आहे. परिणामी, आज बुधवारी भारतीय शेअर बाजारात अस्थिरता दिसून आली. भारतीय इक्विटी निर्देशांक आज सपाट पातळीवर बंद झाले. सेन्सेक्स आज २७ अंकांच्या किरकोळ घसरणीसह ७३,८७६ वर बंद झाला. तर निफ्टी १८ अंकांनी घसरून २२,४३४ वर स्थिरावला. (Stock Market Closing Bell)
विशेष म्हणजे आज कमकुवत सुरुवातीनंतर बाजारात रिकव्हरी दिसून आली आणि दोन्ही निर्देशांक सपाट पातळीवर बंद झाले. बाजारात सरकारी बँकिंग आणि आयटी क्षेत्रातील खरेदीमुळे सपोर्ट मिळाला. एफएमसीजी आणि फार्मा क्षेत्रातील विक्रीमुळे दबाव राहिला.
आज बाजाराची सुरुवात कमकुवत झाली होती. पण सुरुवातीच्या तासांत रिकव्हरी झाली. IT, मेटल, ऑईल आणि गॅस, पॉवर निर्देशांकांतील तेजीमुळे तो विक्रमी उच्चांकाच्या जवळ पोहोचला. पण बाजार बंदच्या वेळी विक्री झाल्याने सुरुवातीचा नफा कमी झाला.
क्षेत्रीय आघाडीवर, रियल्टी निर्देशांक २.५ टक्क्यांनी घसरला. तर ऑटो निर्देशांक ०.४ टक्क्यांनी खाली आला. दरम्यान, पॉवर, पीएसयू बँक निर्देशांक प्रत्येकी १ टक्क्यांनी आणि आयटी, मीडिया निर्देशांक प्रत्येकी ०.५ टक्क्यांनी वाढले. बीएसई मिडकॅप निर्देशांक ०.६ टक्के आणि स्मॉलकॅप निर्देशांक १ टक्क्याने वधारला.
निफ्टीवर श्रीराम फायनान्स, एनटीपीसी, टीसीएस, टेक महिंद्रा हे तेजीत होते. तर नेस्ले इंडिया, बजाज ऑटो, कोटक महिंद्रा बँक, ब्रिटानिया इंडस्ट्रीज हे शेअर्स घसरले.
फेडरल रिझर्व्हकडून व्याजदर कपातीला विलंब होईल या धास्तीने इतर आशियाई बाजारांतही घसरण पाहायला मिळाली. यामुळे गुंतवणूकदारांनी सावधगिरी बाळगली आहे. (Stock Market Closing Bell)
Latest Marathi News सेन्सेक्स, निफ्टी सपाट, realty ला फटका, IT तेजीत Brought to You By : Bharat Live News Media.