‘संघर्षयोद्धा’ – मनोज जरांगे पाटील चित्रपटात ‘उधळीन जीव’ हृदयस्पर्शी गाणं

पुढारी ऑनलाईन डेस्क : मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या जीवनपटाचा वेध “संघर्षयोद्धा – मनोज जरांगे पाटील” या चित्रपटातून घेतला जाणार आहे. गायक अजय गोगावले यांच्या आवाजात “उधळीन जीव…” हे हृदयस्पर्शी गाणं या चित्रपटाचं आणखी एक वैशिष्ट्य ठरणार आहे. २६ एप्रिल रोजी “संघर्षयोद्धा” मनोज जरांगे पाटील हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. शिवाजी दोलताडे यांनी … The post ‘संघर्षयोद्धा’ – मनोज जरांगे पाटील चित्रपटात ‘उधळीन जीव’ हृदयस्पर्शी गाणं appeared first on पुढारी.
‘संघर्षयोद्धा’ – मनोज जरांगे पाटील चित्रपटात ‘उधळीन जीव’ हृदयस्पर्शी गाणं

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या जीवनपटाचा वेध “संघर्षयोद्धा – मनोज जरांगे पाटील” या चित्रपटातून घेतला जाणार आहे. गायक अजय गोगावले यांच्या आवाजात “उधळीन जीव…” हे हृदयस्पर्शी गाणं या चित्रपटाचं आणखी एक वैशिष्ट्य ठरणार आहे. २६ एप्रिल रोजी “संघर्षयोद्धा” मनोज जरांगे पाटील हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
शिवाजी दोलताडे यांनी दिग्दर्शनाची जबाबदारी निभावलेली असून सोनाई फिल्म क्रिएशन या निर्मिती संस्थेच्या गोवर्धन दोलताडे यांनी चित्रपटाच्या निर्मितीसह चित्रपटाचं लेखनही केलं आहे. सहनिर्माते रामदास मेदगे, जान्हवी मनोज तांबे, दत्तात्रय लोहकरे कार्तिक दोलताडे, नर्मदा सिनेव्हिजन्स हे आहेत. तर डॉ.सुधीर निकम यांनी संवाद आणि पटकथा लिहिली आहे. या चित्रपटात मनोज जरांगे पाटील यांची मध्यवर्ती भूमिका अभिनेता रोहन पाटील यांनी साकारली आहे. या चित्रपटात अभिनेता संदीप पाठक, सागर कारंडे, अरबाज शेख, अभिनेते मोहन जोशी, श्रीनिवास पोकळे, संजय कुलकर्णी, अभिनेत्री सुरभी हांडे, माधवी जुवेकर, विजय मिश्रा, विनीत भोंडे, सुनील गोडबोले, माधव अभ्यंकर, सोमनाथ अवघडे , किशोर चौगुले , सिद्धेश्वर झाडबुके, उर्मिला डांगे यांच्या ही प्रमुख भूमिका आहेत.

“उधळीन जीव….” या गाण्याचं लेखन वैभव देशमुख यांनी केलं असून, संगीतकार विजय नारायण गवंडे यांनी हे गाणं संगीतबद्ध केलं आहे. तर गायक अजय गोगावले यांनी त्यांच्या भावोत्कट आवाजात हे गाणं गायलं आहे.
Latest Marathi News ‘संघर्षयोद्धा’ – मनोज जरांगे पाटील चित्रपटात ‘उधळीन जीव’ हृदयस्पर्शी गाणं Brought to You By : Bharat Live News Media.