काँग्रेसला धक्का, बॉक्सर विजेंदर सिंह आता भाजपच्या रिंगमध्ये, हाती घेतले कमळ

पुढारी ऑनलाईन : लोकसभा निवडणुकीच्या आधी काँग्रेसला आणखी एक धक्का बसला आहे. ऑलिम्पिक पदक विजेते बॉक्सर आणि काँग्रेस नेते विजेंदर सिंह यांनी आज बुधवारी भाजपमध्ये प्रवेश केला. बॉक्सर विजेंद्रर यांनी X वर एका ओळीची पोस्ट केली होती. त्यानंतर लोकसभा निवडणुकीच्या आधी अनेक अटकळी अटकळी बांधण्यात आल्या. ‘जनतेची इच्छा असेल तिथे मी तयार आहे.’ असे त्यांनी … The post काँग्रेसला धक्का, बॉक्सर विजेंदर सिंह आता भाजपच्या रिंगमध्ये, हाती घेतले कमळ appeared first on पुढारी.

काँग्रेसला धक्का, बॉक्सर विजेंदर सिंह आता भाजपच्या रिंगमध्ये, हाती घेतले कमळ

Bharat Live News Media ऑनलाईन : लोकसभा निवडणुकीच्या आधी काँग्रेसला आणखी एक धक्का बसला आहे. ऑलिम्पिक पदक विजेते बॉक्सर आणि काँग्रेस नेते विजेंदर सिंह यांनी आज बुधवारी भाजपमध्ये प्रवेश केला. बॉक्सर विजेंद्रर यांनी X वर एका ओळीची पोस्ट केली होती. त्यानंतर लोकसभा निवडणुकीच्या आधी अनेक अटकळी अटकळी बांधण्यात आल्या. ‘जनतेची इच्छा असेल तिथे मी तयार आहे.’ असे त्यांनी म्हटले होते.
२०१९ मध्ये काँग्रेसमध्ये दाखल झालेल्या विजेंदर सिंह यांना पहिल्याच निवडणुकीत पराभवाला सोमोरे जावे लागले. तरीही ते काँग्रेससोबत कायम राहिले. त्यानंतर त्यांनी डिसेंबर २०२३ मध्ये सोशल मीडिया पोस्टद्वारे राजकारणातून निवृत्ती घेत असल्याचे जाहीर केले. पण आता पुन्हा त्यांनी राजकारणात वापसी केली आहे.
विजेंदर यांनी २०१९ मध्ये काँग्रेसकडून दक्षिण दिल्लीतून निवडणूक लढवली होती. पण भाजपच्या रमेश विधूडी यांनी त्यांचा पराभव केला. त्यानंतर विजेंदरची राजकारणातील सक्रियता कमी झाली. २०२३ मध्ये त्यांनी राजकारणाला रामराम केला होता.
मथुरा येथून भाजपचे उमेदवार म्हणून त्यांचे नाव गेल्या काही दिवसांपासून चर्चेत होते. येथून अभिनेत्री आणि विद्यमान खासदार हेमा मालिनी पुन्हा निवडणूक लढवत आहेत. विजेंदर सिंह हे हरियाणातील राजकारणात मोठा प्रभाव असलेल्या जाट समुदायातील आहेत.

#WATCH | Boxer & Congress leader Vijender Singh joins BJP at the party headquarters in Delhi#LokSabhaElections2024 pic.twitter.com/5fqOt9KIcp
— ANI (@ANI) April 3, 2024

The post काँग्रेसला धक्का, बॉक्सर विजेंदर सिंह आता भाजपच्या रिंगमध्ये, हाती घेतले कमळ appeared first on Bharat Live News Media.

Go to Source