या ग्रामपंचायतीचा पॅटर्नच वेगळा ! एकावेळी निवडले दोन उपसरपंच
मंचर : पुढारी वृत्तसेवा : राज्य सरकारमध्ये दोन उपमुख्यमंत्री निवडीचा पॅटर्न आता स्थिर झालेला असतान आत ग्रामपंचायतीही त्याचा कित्ता गिरवायला लागल्या आहेत ….! आंबेगाव तालुक्यातील जारकरवाडी ग्रामपंचायतीने दोन उपसरपंच पदी दोघांची निवड करून नवा पॅटर्न राजकारणाला दिला आहे. राज्यात दोन उपमुख्यमंत्री आहेत,त्याचाच आदर्श घेऊन आंबेगाव तालुक्यातील जारकरवाडी ग्रामपंचायतीला दोन उपसरपंच असावेत,अशी मागणी या ग्रामपंचायतीमधील सदस्यांनी पत्रक काढून केल्याने आता जारकरवाडी ग्रामपंचायतीला दोन उपसरपंच नेमण्यात आले आहेत.कौसल्या संतोष भोजने,सचिन बापू टाव्हरे यांची उपसरपंचपदी निवड झाल्याचे सरपंच प्रतीक्षा कल्पेश बढेकर यांनी जाहीर केले आहे.
संबंधित बातम्या :
Pune : बारामती शहर, तालुक्यात भाजपमध्ये नाराजी
Pune : खेड तालुक्यात सापडल्या 39 हजार 682 कुणबी नोंदी
Pune : शिक्रापूरला भुसा घेऊन जाणारी ट्रॉली उलटली
बढेकर यांनी पत्रात म्हटले आहे की, २३ नोव्हेंबर रोजी ग्रामपंचायत जारकरवाडीच्या उपसरपंच पदाच्या निवडणुकीबाबत ग्रामपंचायत अधिनियम १९५१५ कलम २८(१) प्रमाणे नियम १९८४ मधील तरतुदी नुसार सरपंच प्रतीक्षा कल्पेश बढेकर यांच्या अध्यक्षतेखाली उपसरपंच पदाची निवडणूक घेण्यात आली. मी एस.टी. प्रवर्गातून सरपंचपदी असल्याने आणि आमच्या गावच्या लोकसंख्येचा,विस्ताराचा विचार करता ग्रामपंचायत जारकरवाडी करिता दोन उपसरपंचांची नेमणूक करण्याची सर्व परिस्थिती पाहता गरज वाटत आहे.महाराष्ट्र राज्यामध्ये एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री कार्यभार स्विकारतात,त्याचप्रमाणे मी माझ्या जारकरवाडी गावामध्ये माझ्या अध्यक्षतेखाली सर्व सदस्याच्या विचाराने कौसल्या संतोष भोजने यांची उपसरपंचपदी नियमानुसार निवड झाली आहे, त्याच वेळीस सचिन बापू टाव्हरे यांची उपसरपंच ग्रामपंचायत अधिनियम कलम २८(१) प्रमाणे नियम १९६५ मधील तरतुदीनुसार उपसरपंच म्हणून सर्व सदस्यांच्या मताने सह्यानिशी माझ्या अध्यक्षतेखाली निवड करत आहे.या निवडीने जसे राज्याला दोन उपमुख्यमंत्री लाभले आहेत. त्याच प्रमाणे जारकरवाडीला देखील दोन उपसरपंचाची निवड करत आहे.
राजकारण्यांची होणार साेय
जारकरवाडीतील घडामोडीमुळे इथून पुढे राज्यातील ग्रामपंचायतींना देखील दोन उपसरपंच मिळणार आणि राजकारणी मंडळींची सोय होणार याची चर्चा मात्र रंगली आहे. जसे राज्याला दोन उपमुख्यमंत्री आहेत, तसे प्रत्येक गावाला दोन उपसरपंच निवडायला परवांगी द्या अशी जारकरवाडी ग्रामस्थांची मागणी आहे.
मान्यतेसाठी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र
दुसऱ्या उपसरपंचांच्या निवडीला मान्यता द्यावी, अशी मागणी जारकरवाडी ग्रामपंचायतीने जिल्हाधिकऱ्यांकडे केली आहे . जारकरवाडी ग्रामपंचायतीची पंचवार्षिक निवडणुक नुकतीच बिनविरोध पार पडली होती. जनतेतून निवडण्यात येणारा सरपंच बिनविरोध निवडण्यात आला होता व आता दोन्हीं उपसरपंचही बिनविरोध निवडण्यात आले आहेत.ग्रामपंचायत अधिनियमानुसार एका उपसरपंचाची निवड झाली आहे तर, सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांनी ठरावाद्वारे दुसऱ्या उपसरपंचाची निवड केली आहे.
The post या ग्रामपंचायतीचा पॅटर्नच वेगळा ! एकावेळी निवडले दोन उपसरपंच appeared first on पुढारी.
मंचर : पुढारी वृत्तसेवा : राज्य सरकारमध्ये दोन उपमुख्यमंत्री निवडीचा पॅटर्न आता स्थिर झालेला असतान आत ग्रामपंचायतीही त्याचा कित्ता गिरवायला लागल्या आहेत ….! आंबेगाव तालुक्यातील जारकरवाडी ग्रामपंचायतीने दोन उपसरपंच पदी दोघांची निवड करून नवा पॅटर्न राजकारणाला दिला आहे. राज्यात दोन उपमुख्यमंत्री आहेत,त्याचाच आदर्श घेऊन आंबेगाव तालुक्यातील जारकरवाडी ग्रामपंचायतीला दोन उपसरपंच असावेत,अशी मागणी या ग्रामपंचायतीमधील सदस्यांनी …
The post या ग्रामपंचायतीचा पॅटर्नच वेगळा ! एकावेळी निवडले दोन उपसरपंच appeared first on पुढारी.