‘घड्याळ’ चिन्‍हाबाबतच्‍या आदेशाचे उल्‍लंघन : शरद पवार गटाची सुप्रीम कोर्टात धाव

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : राष्‍ट्रवादी काँग्रेसच्‍या अजित पवार गटाने ‘घड्याळ’ चिन्हाचा वापर न्यायप्रविष्ट असल्याचे वृत्तपत्रात प्रसिद्ध करावे, असा आदेश   सर्वोच्‍च न्‍यायालयाने दिला होते. मात्र अजित पवार गटाकडून या निर्देशाचे पालन केले नसल्याचा आरोप करत शरद पवार गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून सर्वोच्च न्यायालयाने घड्याळ चिन्‍हाबाबत दिलेल्‍या  आदेशाचे पालन केले जात नसल्याचा … The post ‘घड्याळ’ चिन्‍हाबाबतच्‍या आदेशाचे उल्‍लंघन : शरद पवार गटाची सुप्रीम कोर्टात धाव appeared first on पुढारी.
‘घड्याळ’ चिन्‍हाबाबतच्‍या आदेशाचे उल्‍लंघन : शरद पवार गटाची सुप्रीम कोर्टात धाव


Bharat Live News Media ऑनलाईन डेस्‍क : राष्‍ट्रवादी काँग्रेसच्‍या अजित पवार गटाने ‘घड्याळ’ चिन्हाचा वापर न्यायप्रविष्ट असल्याचे वृत्तपत्रात प्रसिद्ध करावे, असा आदेश   सर्वोच्‍च न्‍यायालयाने दिला होते. मात्र अजित पवार गटाकडून या निर्देशाचे पालन केले नसल्याचा आरोप करत शरद पवार गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून सर्वोच्च न्यायालयाने घड्याळ चिन्‍हाबाबत दिलेल्‍या  आदेशाचे पालन केले जात नसल्याचा आरोप करत शरद पवार गटाकडून केंद्रीय निवडणूक आयोगात तक्रार दाखल करण्यात आली हाेती. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी तक्रार करण्यासाठी थेट दिल्ली गाठली. ७२ तासात आयोगाने कारवाई केली नाही तर मग आम्हाला पुढे जावे लागेल म्हणत सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा इशाराही दिला हाेता.

#BREAKING NCP Dispute : Sharad Pawar group moves Supreme Court alleging that Ajit Pawar group has not complied with the #SupremeCourt direction to make newspaper publications that use of ‘clock’ symbol is sub-judice#NCPRift pic.twitter.com/HUI3ZxlWV6
— Live Law (@LiveLawIndia) April 3, 2024

सर्वोच्‍च न्‍यायालयाचे अजित पवार गटाला आदेश काय?
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या फुटीनंतर निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ निवडणूक चिन्ह अजित पवारांना दिले. पुढे शरद पवार गटाला ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष- शरदचंद्र पवार’ हे नाव आणि तुतारी वाजवणारा माणूस हे पक्ष चिन्ह दिले. मात्र त्यानंतरही दोन्ही गटांमधील वाद शमण्याचे नाव घेत नाही. दोन दिवसापूर्वी सर्वोच्च न्यायालयात राष्ट्रवादी काँग्रेसबाबत सुनावणी पार पडली. यावेळी अजित पवार गटाने शरद पवारांचे नाव किंवा फोटो वापरू नये तसेच घड्याळ हे पक्षाचे चिन्ह वापरताना ते प्रकरण न्यायप्रविष्ट आहे, अशी सूचना लिहिण्यास सांगितले होते. मात्र, अजित पवार गटाकडून सर्वोच्च न्यायालयाच्या या सूचनेचे पालन केले जात नसल्याचा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला. अजित पवार गटाच्या नेत्यांच्या सोशल मीडियावरील फोटोंचे पुरावे देखील यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी सादर केले. आणि या संदर्भात केंद्रीय निवडणूक आयोगात तक्रार दाखल केली. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचे पुत्र आणि आमदार अनिकेत तटकरे यांनी अलीकडेच एका कार्यक्रमात शरद पवार यांचा फोटो वापरल्याचे समोर आल्याचे ते म्हणाले.
 
 
.
 
 
 
The post ‘घड्याळ’ चिन्‍हाबाबतच्‍या आदेशाचे उल्‍लंघन : शरद पवार गटाची सुप्रीम कोर्टात धाव appeared first on Bharat Live News Media.

Go to Source