सातारा : आसरेत बाप-लेकाचा बुडून मृत्यू

वाई; पुढारी वृत्तसेवा : धोम बलकवडी धरणातून खंडाळ्याला पाणी सोडण्यासाठी एक कालवारूपी बोगदा काढण्यात आला आहे. या बोगद्यात आसरे, ता. वाई गावच्या हद्दीत पोहत असताना पाण्याचा अंदाज न आल्याने बाप-लेकाचा बुडून मृत्यू झाला. सोमवारी सायंकाळी ही घटना घडली. शोधमोहीम राबवल्यानंतर मंगळवारी सायंकाळी दोघांचे मृतदेह सापडले. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या घटेनची नोंद … The post सातारा : आसरेत बाप-लेकाचा बुडून मृत्यू appeared first on पुढारी.

सातारा : आसरेत बाप-लेकाचा बुडून मृत्यू

वाई; Bharat Live News Media वृत्तसेवा : धोम बलकवडी धरणातून खंडाळ्याला पाणी सोडण्यासाठी एक कालवारूपी बोगदा काढण्यात आला आहे. या बोगद्यात आसरे, ता. वाई गावच्या हद्दीत पोहत असताना पाण्याचा अंदाज न आल्याने बाप-लेकाचा बुडून मृत्यू झाला. सोमवारी सायंकाळी ही घटना घडली. शोधमोहीम राबवल्यानंतर मंगळवारी सायंकाळी दोघांचे मृतदेह सापडले. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या घटेनची नोंद वाई पोलिस ठाण्यात झाली आहे.
उत्तम सहदेव ढवळे (वय 42) व अभिजित उत्तम ढवळे (वय 10) अशी बुडून मृत्यू झालेल्या बाप-लेकाची नावे आहेत. एप्रिल महिना सुरू झाल्याने नागरिकांच्या अंगाची लाहीलाही होऊ लागली आहे. त्यावर थंडावा म्हणून अनेक जण पोहण्याचा बेत आखतात. मात्र, पाण्यात उतरणे हे अनेकांच्या जीवावर बेतत असल्याचे वास्तव आहे. दोनच दिवसांपूर्वी महाबळेश्वर तालुक्यातील वाळणे येथे दोन शाळकरी मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला होता. त्यानंतर आसरेत बाप-लेकाचा मृत्यू झाल्याने वाई तालुक्यात खळबळ उडाली आहे.
आसरे, ता. वाई येथून धोम धरणातून खंडाळ्याला जाण्यासाठी कालवा रुपी बोगदा काढण्यात आलेला आहे. हा बोगदा खोल असून त्यातून बारमाही पाणी वाहत असते. सोमवारी सायंकाळी 6 वाजता ढवळे आपल्या मुलासमवेत त्या बोगद्यात पोहायला गेले होते. यावेळी त्यांना पाण्याचा अंदाज न आल्याने ते बुडाले. रात्री उशिर झाला तरी दोघेही घरी न आल्याने कुटुंबियांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी त्यांचे कपडे दिसून आले मात्र ते दोघे कुठेच नसल्याने कुटुंबियांनी ग्रामस्थांसह शोध घेण्यास सुरूवात केली. याचदरम्यान पोलिसांनाही या घटनेची माहिती देण्यात आली. मात्र, रात्रीची वेळ असल्याने त्यांचा शोध घेण्यात अडचणी आल्या. बुडालेल्या बाप-लेकाच्या शोधासाठी सह्याद्री रेस्क्यू टीम महाबळेश्वर, सह्याद्री रेस्क्यू टीम प्रतापगड व शिवसह्याद्री रेस्क्यू टीम वाई या तीनही टीमना पाचारण करण्यात आले होते. सोमवारी दोघांचाही शोध न लागल्याने मंगळवारी पुन्हा शोध मोहीम राबवण्यात आली. मदतकार्यात सहभागी झालेल्या शिवसह्याद्रि रेस्क्यु टिमचे सदस्य आशुतोष शिंदे (रा. वाई) हे जखमी झाले असून त्यांच्यावर खाजगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
मंगळवारी सकाळी 6 वाजता शोध मोहीम सुरू केली. अथक प्रयत्नानंतर दुपारी 3 वाजता उत्तम ढवळे यांचा मृतदेह सापडला तर सायंकाळी 6 वाजता मुलगा अभिजीत याचा मृतदेह सापडला. मृतदेह सापडल्यानंतर वाई ग्रामीण रूग्णालयात दोन्ही मृतदेहांचे शवविच्छेदन करण्यात आले.
Latest Marathi News सातारा : आसरेत बाप-लेकाचा बुडून मृत्यू Brought to You By : Bharat Live News Media.