आपचे चार नेते भाजपच्या रडारवर
नवी दिल्ली; वृत्तसंस्था : दिल्ली सरकारमधील मंत्री आणि आम आदमी पक्षाच्या (आप) ज्येष्ठ नेत्या आतिशी यांनी भाजपकडून पक्षात प्रवेश करण्यासाठी दबाव आणला जात असल्याचा गौप्यस्फोट केला. लोकसभा निवडणुकीच्या काळात आपच्या चार ज्येष्ठ नेत्यांना अटक करण्याची खेळी भाजपने रचली असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
मद्य धोरण घोटाळाप्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची रवानगी तिहार तुरुंगात करण्यात आली आहे. न्यायालयाने त्यांना 15 एप्रिलपर्यंत कोठडी सुनावली आहे. सक्तवसुली संचलनालयाच्या (ईडी) वकिलांनी न्यायालयातील सुनावणीवेळी केजरीवाल यांनी आतिशी आणि सौरभ भारद्वाज यांची नावे घेतल्याचे निदर्शनास आणून दिले होते. या पार्श्वभूमीवर आतिशी यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्या म्हणाल्या की, भाजपच्या बड्या नेत्यांकडून मला भाजपात प्रवेश करण्यासाठी ऑफर दिली होती. राजकीय भविष्य वाचविण्यासाठी भाजपमध्ये प्रवेश करा अन्यथा आपल्याला ईडीकडून अटक करण्यात येईल, अशी भीतीही भाजप नेत्यांनी आपणास दाखविली होती, असा आरोप त्यांनी केला. निवडणुकीच्या काळात माझ्यासह भारद्वाज, दुर्गेश पाठक,राघव चढ्ढा यांना अटक करण्याचा डाव भाजपकडून रचला जात असल्याचेही त्यांनी निदर्शनास आणून दिले.
The post आपचे चार नेते भाजपच्या रडारवर appeared first on Bharat Live News Media.
Home महत्वाची बातमी आपचे चार नेते भाजपच्या रडारवर
आपचे चार नेते भाजपच्या रडारवर
नवी दिल्ली; वृत्तसंस्था : दिल्ली सरकारमधील मंत्री आणि आम आदमी पक्षाच्या (आप) ज्येष्ठ नेत्या आतिशी यांनी भाजपकडून पक्षात प्रवेश करण्यासाठी दबाव आणला जात असल्याचा गौप्यस्फोट केला. लोकसभा निवडणुकीच्या काळात आपच्या चार ज्येष्ठ नेत्यांना अटक करण्याची खेळी भाजपने रचली असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. मद्य धोरण घोटाळाप्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची रवानगी तिहार तुरुंगात करण्यात आली …
The post आपचे चार नेते भाजपच्या रडारवर appeared first on पुढारी.