बारामतीत सुप्रिया सुळेंना ‘वंचित’चा पाठिंबा

मुंबई : वंचित बहुजन आघाडीने मंगळवारी जाहीर केलेल्या उमेदवारांच्या यादीत मनसेचे नाराज नेते वसंत मोरे यांना पुणे मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. तर दुसरीकडे बारामती लोकसभा मतदारसंघात उमेदवार उभा न करता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांना पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे बारामतीत सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीच्या उमेदवार सुनेत्रा … The post बारामतीत सुप्रिया सुळेंना ‘वंचित’चा पाठिंबा appeared first on पुढारी.

बारामतीत सुप्रिया सुळेंना ‘वंचित’चा पाठिंबा

मुंबई : वंचित बहुजन आघाडीने मंगळवारी जाहीर केलेल्या उमेदवारांच्या यादीत मनसेचे नाराज नेते वसंत मोरे यांना पुणे मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. तर दुसरीकडे बारामती लोकसभा मतदारसंघात उमेदवार उभा न करता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांना पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे बारामतीत सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्यात सरळ लढत होणार आहे.
वंचित बहुजन आघाडीने मंगळवारी रात्री उशीरा आपली लोकसभा उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली. यामध्ये पाच जणांना उमेदवारी दिली आहे. अविनाश भोसीकर (नांदेड), बाबासाहेब उगले (परभणी), अफसर खान (औरंगाबाद), वसंत मोरे (पुणे) व मंगलदास बांगल (शिरूर) यांचा यामध्ये समावेश आहे. वंचितने लोकसभा निवडणुकीसाठी आतापर्यंत एकूण 25 उमेदवार घोषित केले आहेत. नवनिर्माण सेनेचे माजी नगरसेवक वसंत मोरे यांनी काही दिवसांपूर्वी मनसेला अखेरचा जय महाराष्ट्र केला होता.
Latest Marathi News बारामतीत सुप्रिया सुळेंना ‘वंचित’चा पाठिंबा Brought to You By : Bharat Live News Media.