शाळांमध्ये आजपासून अंडा बिर्याणी !

नगर : पुढारी वृत्तसेवा : इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना अतिरिक्त आहारातून पोषक घटकतत्त्व मिळावेत, यासाठी आठवड्यातून एक दिवस त्यांना उकडलेली अंडी किंवा पुलाव, बिर्याणी आणि ज्यांना अंडी नको त्यांना केळी दिली जाणार आहेत. आज शुक्रवारपासून या योजनेचा प्रारंभ होणार असून, पहिल्याच दिवशी 4 लाख 57 हजार 192 विद्यार्थ्यांपर्यंत अंडी आणि केळी पोहोचविण्यासाठी गुरुजींची लगबग … The post शाळांमध्ये आजपासून अंडा बिर्याणी ! appeared first on पुढारी.
#image_title

शाळांमध्ये आजपासून अंडा बिर्याणी !

नगर : पुढारी वृत्तसेवा : इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना अतिरिक्त आहारातून पोषक घटकतत्त्व मिळावेत, यासाठी आठवड्यातून एक दिवस त्यांना उकडलेली अंडी किंवा पुलाव, बिर्याणी आणि ज्यांना अंडी नको त्यांना केळी दिली जाणार आहेत. आज शुक्रवारपासून या योजनेचा प्रारंभ होणार असून, पहिल्याच दिवशी 4 लाख 57 हजार 192 विद्यार्थ्यांपर्यंत अंडी आणि केळी पोहोचविण्यासाठी गुरुजींची लगबग गुुरुवारी सुरू असल्याचे पाहायला मिळाले. केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत विद्यार्थ्यांंना आठवड्यातून एक दिवस अंडी देण्याचा निर्णय झालेला आहे. जे विद्यार्थी अंडे घेणार नाहीत, त्यांना पर्यायी केळी किंवा अन्य फळे दिली जाणार आहेत. वर्षभरात 23 आठवडे हा आहार देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या निर्णयावर पालकांमधून संमिश्र प्रतिक्रिया मिळत आहेत.
जिल्ह्यात पोषण आहाराचे 4 लाख 57 हजार 192 विद्यार्थी लाभार्थी आहेत. त्यांना नियमितच्या पोषण आहारासोबतच आता आठवड्यातून एक दिवस प्रत्येकी एक अंडे दिले जाणार आहे. त्यामुळे आठवड्याला साडेचार लाख अंडी उपलब्ध करण्यासाठी गुरुजींना आता शाळा सोडून पोल्ट्रीफार्मची शोधाशोध करावी लागणार आहे. त्यातच बाजारात अंडी सात रुपयांना असताना, शासन शाळेला अंड्याला पाच रुपयेच देणार आहे. त्यामुळे ही जुळवाजुळवही शिक्षकांना करावी लागणार आहे.
पैसेच नाहीत, अंडी द्यायची कशी?
ही योजना शुक्रवार, दि. 24 पासून सुरू होणार आहे. त्याचा शिक्षण विभागाने आढावा घेतला आहे. मात्र प्रतिविद्यार्थी पाच रुपयांप्रमाणे सहा आठवड्यांचे विद्यार्थिनिहाय 30 रुपये आगाऊ प्रत्येक शाळांना मिळणार आहेत. मात्र ते अद्याप पोहोचलेले नाहीत. त्यामुळे शुक्रवारी विद्यार्थ्यांना अंडी, केळी कशी उपलब्ध करायची, असाही प्र्रश्न शिक्षकांसमोर आहे. विद्यार्थ्यांना हा आहार दिला जातो की नाही, याची खातरजमा शिक्षणाधिकारी व अधीक्षक करणार आहेत.
हेही वाचा :

नंदुरबार : नारायण राणे यांच्याकडून विकसित भारत संकल्प यात्रेचा आढावा
Pune : बारामती शहर, तालुक्यात भाजपमध्ये नाराजी

The post शाळांमध्ये आजपासून अंडा बिर्याणी ! appeared first on पुढारी.

नगर : पुढारी वृत्तसेवा : इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना अतिरिक्त आहारातून पोषक घटकतत्त्व मिळावेत, यासाठी आठवड्यातून एक दिवस त्यांना उकडलेली अंडी किंवा पुलाव, बिर्याणी आणि ज्यांना अंडी नको त्यांना केळी दिली जाणार आहेत. आज शुक्रवारपासून या योजनेचा प्रारंभ होणार असून, पहिल्याच दिवशी 4 लाख 57 हजार 192 विद्यार्थ्यांपर्यंत अंडी आणि केळी पोहोचविण्यासाठी गुरुजींची लगबग …

The post शाळांमध्ये आजपासून अंडा बिर्याणी ! appeared first on पुढारी.

Go to Source