बाजारात सुस्ती! IT स्टॉक्सना फटका, LIC ची विक्रमी झेप, आज काय घडलं?
पुढारी ऑनलाईन : शेअर बाजारात आजही (दि.२४) सुस्त स्थिती दिसून आली. सेन्सेक्स ४७ अंकांनी घसरून ६५,९७० वर बंद झाला. तर निफ्टी ७ अंकांच्या किरकोळ घसरणीसह १९,७९४ वर स्थिरावला. आज सुमारे १,७२१ शेअर्स वाढले. तर १,८४९ शेअर्समध्ये घसरण झाली आणि ११४ शेअर्समध्ये कोणताही बदल झाली नाही. आजच्या सत्रात आयटी स्टॉक्सना मोठा फटका बसला. तर फार्मा, मेटल स्टॉक्समध्ये खरेदीची जोर दिसून आला. क्षेत्रीयमध्ये फार्मा निर्देशांक १ टक्क्यांनी वाढला, तर आयटी, ऑईल आणि गॅस स्टॉक्समध्ये विक्री दिसून आली. (Closing Bell)
‘या’ शेअर्सवर दबाव
सेन्सेक्सवर टीसीएस, विप्रो, एचसीएल टेक, टेक महिंद्रा, नेस्ले इंडिया, टाटा मोटर्स, बजाज फायनान्स, इन्फोसिस, इंडसइंड बँक हे शेअर्स घसरले. तर ॲक्सिस बँक, जेएसडब्ल्यू स्टील, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, एनटीपीसी, एम अँड एम शेअर्स वाढले.
LIC शेअर्सची विक्रमी झेप
लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन (LIC) च्या शेअर्सचा आज सुमारे १० टक्क्यांनी वाढला. बाजारात मे २०२२ मध्ये सूचीबद्ध झाल्यापासूनची LIC शेअर्सची (LIC shares) एका दिवसातील ही सर्वोत्तम कामगिरी आहे. न्यू बिझनेस प्रीमियम (NBP) मध्ये वाढ करण्यासाठी येत्या काही महिन्यांत ३-४ नवीन उत्पादने लाँच करण्याच्या कंपनीच्या योजनांमुळे गुंतवणूकदारांचा उत्साह वाढला आहे. यामुळे आज हा शेअर ९.८३ टक्के वाढीसह ६७८ रुपयांवर पोहोचला.
Mamaearth सलग दुसऱ्या दिवशी तेजीत
Mamaearth ची पेरेंट कंपनी Honasa Consumer share चे शेअर्स दुपारच्या व्यवहारात ११ टक्क्यांनी वाढले. हा शेअर्समध्ये सलग दुसऱ्या दिवशीही तेजी राहिली. दुपारी हा शेअर ११ टक्क्यांनी वाढून ४७१.२५ रुपयांवर पोहोचला होता. या आठवड्याच्या सुरुवातीला Honasa च्या महसुलात २१ टक्के वाढ झाली आहे. तसेच नफाही दुपटीने वाढला आहे. या पार्श्वभूमीवर होनासा कन्झूमरचे शेअर्स वधारले आहेत.
अदानी एंटरप्रायझेसचा शेअर्स वाढला
अदानी- हिंडेनबर्ग प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान बाजार नियामक सेबीकडून सुप्रीम कोर्टात सांगण्यात आले की गौतम अदानी यांच्या समूहाची चौकशी पूर्ण करण्यासाठी मुदतवाढ मागितली जाणार नाही. यानंतर अदानी एंटरप्रायझेसच्या शेअर १ टक्क्यांहून अधिक वाढून २,२११ रुपयांवर पोहोचला.
The post बाजारात सुस्ती! IT स्टॉक्सना फटका, LIC ची विक्रमी झेप, आज काय घडलं? appeared first on पुढारी.
पुढारी ऑनलाईन : शेअर बाजारात आजही (दि.२४) सुस्त स्थिती दिसून आली. सेन्सेक्स ४७ अंकांनी घसरून ६५,९७० वर बंद झाला. तर निफ्टी ७ अंकांच्या किरकोळ घसरणीसह १९,७९४ वर स्थिरावला. आज सुमारे १,७२१ शेअर्स वाढले. तर १,८४९ शेअर्समध्ये घसरण झाली आणि ११४ शेअर्समध्ये कोणताही बदल झाली नाही. आजच्या सत्रात आयटी स्टॉक्सना मोठा फटका बसला. तर फार्मा, मेटल …
The post बाजारात सुस्ती! IT स्टॉक्सना फटका, LIC ची विक्रमी झेप, आज काय घडलं? appeared first on पुढारी.