काँग्रेसकडून लोकसभेच्या १६ , आंध्र विधानसभेच्या ११४ उमेदवारांची यादी जाहीर
Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : काँग्रेस पक्षाने आगामी लोकसभा निवडणुकीसाठी १७ तर आंध्र प्रदेश विधानसभेच्या ११४ उमेदवारांची यादी आज (दि.२ एप्रिल) जाहीर केली आहे. पक्षाने वायएस शर्मिला रेड्डी यांना कडप्पा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे.
Congress releases a list of 114 candidates for the upcoming assembly elections in Andhra Pradesh. pic.twitter.com/e6bsAnnNWh
— ANI (@ANI) April 2, 2024
Congress releases a list of 17 candidates for the upcoming Lok Sabha Elections
YS Sharmila Reddy fielded from Andhra Pradesh’s Kadapa, Tariq Anwar fielded from Bihar’s Katihar pic.twitter.com/WZxgd2xkNW
— ANI (@ANI) April 2, 2024
काँग्रेसकडून आतापर्यंत लोकसभेच्या २४० उमेदवारांची घोषणा
यापूर्वी सोमवारी १ एप्रिल रोजी काँग्रेसने जाहीर केलेल्या यादीत महाराष्ट्रातील अकोला मतदारसंघातून अभय काशिनाथ पाटील तर कडियाम काव्य यांना तेलंगणातील वारंगळ मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली हेती. निवडणूक लढवणार आहेत.काँग्रसने आतापर्यंत लोकसभेच्या २४० उमेदवारांची केली घोषणा आहे. लोकसभेच्या 543 जागांसाठी 19 एप्रिल ते 1 जून दरम्यान सात टप्प्यांत निवडणुका होणार आहेत. 4 जून रोजी मतमोजणी होणार आहे.
पक्षाने आज ( दि.२ एप्रिल )जाहीर केलेल्या उमेदवारांच्या यादीनुसार, वायएस शर्मिला रेड्डी आंध्र प्रदेशातील कडप्पा येथून तर एमएम पल्लम राजू काकीनाडा येथून निवडणूक लढवणार आहेत. मोहम्मद जावेद यांना किशनगंजमधून आणि तारिक अन्वर यांना बिहारमधील कटिहारमधून उमेदवारी देण्यात आली आहे.
The post काँग्रेसकडून लोकसभेच्या १६ , आंध्र विधानसभेच्या ११४ उमेदवारांची यादी जाहीर appeared first on Bharat Live News Media.