नाशिक : पाळे खुर्द शिवारात बिबट्याच्या हल्ल्यात शेळी फस्त
कळवण(जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा; कळवण तालुक्यातील पाळे खुर्द शिवारातील केदा दत्तात्रय पाटील यांच्या शेतातील शेड मधील शेळीवर रात्रीच्यावेळी हल्ला करुन बिबट्याने शेळी फस्त केली आहे.
त्यानंतर बिबट्याने पोबारा केला असून वन विभागाचे कर्मचारी अनिल गुंजाळ घटनास्थळी येऊन पाहणी करून पंचनामा करण्यात आला. याच परिसरात 11 नोव्हेंबर रोजी बिबट्याचा बछडा विहिरीत आढळून आला होता. त्याला सुखरूप बाहेर काढण्यात वन विभागाला यश आले होते. मात्र परिसरात बिबट्याचा वावर असल्यामुळे शेतकरी भयभीत झाले आहेत. तात्काळ पिंजरा लावण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
हेही वाचा :
शेळगाव येथे उद्यापासून श्रीसंत मुक्ताबाई यात्रेला प्रारंभ
छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्याला पाणी सोडू नका; पाटबंधारेच्या पत्रानंतर मराठा समाज आक्रमक
The post नाशिक : पाळे खुर्द शिवारात बिबट्याच्या हल्ल्यात शेळी फस्त appeared first on पुढारी.
कळवण(जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा; कळवण तालुक्यातील पाळे खुर्द शिवारातील केदा दत्तात्रय पाटील यांच्या शेतातील शेड मधील शेळीवर रात्रीच्यावेळी हल्ला करुन बिबट्याने शेळी फस्त केली आहे. त्यानंतर बिबट्याने पोबारा केला असून वन विभागाचे कर्मचारी अनिल गुंजाळ घटनास्थळी येऊन पाहणी करून पंचनामा करण्यात आला. याच परिसरात 11 नोव्हेंबर रोजी बिबट्याचा बछडा विहिरीत आढळून आला होता. त्याला …
The post नाशिक : पाळे खुर्द शिवारात बिबट्याच्या हल्ल्यात शेळी फस्त appeared first on पुढारी.