वाढत्या तापमानासह वायू प्रदूषणामुळे मुंबईकर कोंडीत
मुंबई : Bharat Live News Media वृत्तसेवा : मुंबईकरांना सध्या वाढत्या तापमानासह वायू प्रदूषणाला सामोरे जावे लागत आहे. शहर आणि उपनगरात पार्याने पस्तिशी गाठली आहे. दुसरीकडे, वायू प्रदूषणाने खराब पातळी गाठली आहे. सोमवारी सरासरी हवा गुणवत्ता निर्देशांक (एक्यूआय) दीडशेच्या घरात गेला. ( Temperature )
संबंधित बातम्या
IPL 2024, MI captaincy row : रोहित शर्मा पुन्हा मुंबईचा कर्णधार होईल : माजी क्रिकेटपटूचा दावा
Delivery Boy : डिलिव्हरी बॉयविरोधात ताडदेवचे रहिवासी उतरले रस्त्यावर
Lok Sabha Election 2024 : माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण सातार्यातून लढणार
सांताक्रुझ वेधशाळेत सोमवारी किमान 24 आणि कमाल 35 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. मंगळवारी त्याचीच (25/35) पुनरावृत्ती अपेक्षित आहे. त्यातच वायू प्रदूषणात प्रचंड वाढ झाली आहे. कुर्लासह (299), वांद्रे-पूर्व (255), नेरूळ (240), सिद्धार्थनगर-वरळी (224), विलेपार्ले-पश्चिम(219), छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ(214), वांद्रे-कुर्ला संकुल (212), जुहू (200) येथील वायू प्रदूषण खराब कॅटेगरीमध्ये गेले आहे. ( Temperature )
Latest Marathi News वाढत्या तापमानासह वायू प्रदूषणामुळे मुंबईकर कोंडीत Brought to You By : Bharat Live News Media.