डिलिव्हरी बॉयविरोधात ताडदेवचे रहिवासी उतरले रस्त्यावर

मुंबई : पुढारी वृत्तसेवा : ताडदेव परिसरात असलेल्या तुलसी मार्गावर आर्य नगर, जनता नगर येथे 100 हून अधिक दुचाकीस्वार रात्रभर फिरत असतात, त्यामुळे स्थानिक नागरिकांना कर्कश आवाज, वर्दळ आणि असुरक्षितता अशा नानविध समस्यांना दररोज तोंड द्यावे लागते. याबाबत स्थानिक पोलीस स्टेशनला तक्रार करूनही कायमस्वरूपी तोडगा निघाला नाही, परिणामी, संतप्त झालेल्या ताडदेव परिसरातील शकोडो नागरिकांनी रविवारी … The post डिलिव्हरी बॉयविरोधात ताडदेवचे रहिवासी उतरले रस्त्यावर appeared first on पुढारी.

डिलिव्हरी बॉयविरोधात ताडदेवचे रहिवासी उतरले रस्त्यावर

मुंबई : Bharat Live News Media वृत्तसेवा : ताडदेव परिसरात असलेल्या तुलसी मार्गावर आर्य नगर, जनता नगर येथे 100 हून अधिक दुचाकीस्वार रात्रभर फिरत असतात, त्यामुळे स्थानिक नागरिकांना कर्कश आवाज, वर्दळ आणि असुरक्षितता अशा नानविध समस्यांना दररोज तोंड द्यावे लागते. याबाबत स्थानिक पोलीस स्टेशनला तक्रार करूनही कायमस्वरूपी तोडगा निघाला नाही, परिणामी, संतप्त झालेल्या ताडदेव परिसरातील शकोडो नागरिकांनी रविवारी रस्त्यावर उतरून आंदोलन पुकारले. ( Delivery Boy )
संबंधित बातम्या 

Lok Sabha Election 2024 : माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण सातार्‍यातून लढणार
१० वर्षांतील विकास हा फक्‍त ट्रेलर : नरेंद्र मोदी 
Loksabha election 2024 : ..तर सूनबाई सर्वांच्या लाडक्या होतील

लोढा यांची मध्यस्थी
स्थानिक आमदार तथा मुंबई शहरचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी या रहिवाशांची भेट घेतली. लोढा म्हणाले की, ताडदेेवच्या नागरिकांनी कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मागणी केली आहे. त्यांना पोलिसांनी सहकार्य करावे, अशी त्यांची अपेक्षा आहे. हा माझा मतदारसंघ आहे. त्यांना कोणताही त्रास होऊ नये, ही माझी जबाबदारी आहे. अखेर पोलिसांनी रहिवाशांच्या तक्रारीची दखल घेतली आणि कायमस्वरूपी तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. ( Delivery Boy )
Latest Marathi News डिलिव्हरी बॉयविरोधात ताडदेवचे रहिवासी उतरले रस्त्यावर Brought to You By : Bharat Live News Media.