राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या ४० स्टार प्रचारकांची यादी जाहीर
Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. परंतु महायुती आणि महाविकास आघाडीत काही जागा वाटपांचा पेच अद्याप सुटलेला नाही. दरम्यान, सर्व पक्षांनी प्रचाराची तयारी सुरू केली आहे. राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाने आपल्या ४० स्टार प्रचारकांची यादी आज (दि.२) जाहीर केली आहे. या यादीत पक्षाचे प्रमुख शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, माजी मंत्री जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, माजी गृहमंत्री अनिल देशमुख, आमदार रोहित पवार यांचा समावेश आहे. NCP-SCP star campaigners
राष्ट्रवादी शरद पवार गटाची (NCP Sharad Pawar Party) लोकसभेसाठी पहिली यादी जाहीर झाली आहे. यामध्ये सुप्रिया सुळे यांच्यासह अमोल कोल्हे, निलेश लंके यांच्या आणखी काही नेत्यांची नावे या यादीत आहेत. महाविकास आघाडीतील ठाकरे गटाने १७ उमेदवारांची यादी आधीच जाहीर केली आहे. त्यापाठोपाठ राष्ट्रवादी शरद पवार गटाने काही नावांची घोषणा केली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून शरद पवार गटाच्या उमेदवारांच्या पहिल्या यादीच्या प्रतिक्षेत होता. यादी जाहीर झाल्यानंतर उमेदवारांच्या समर्थक कार्यकर्त्यांनी आपआपल्या मतदारसंघात आनंदोत्सव साजरा केला आहे. (Lok Sabha Election 2024)
शरद पवार गटाच्या पहिल्या यादीतील नावे
यामध्ये बारामती लोकसभा मतदारसंघातून सुप्रिया सुळे (Supriya Sule), शिरुर लोकसभा मतदारसंघातून डॉ. अमोल कोल्हे (Amol Kolhe), वर्धा लोकसभा मतदारसंघातून अमर काळे (Amar Kale), दिंडोरी मधून भास्करराव भगरे (Bhaskar Rao Bhagre) तर नीलेश लंके ( Nilesh Lanke) यांना अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. जयंत पाटील यांनी या नावांची घोषणा केली.
NCP-SCP issues a list of 40 star campaigners of the party for the upcoming Lok Sabha elections.
Party chief Shard Pawar, Supriya Sule, Jayant Patil, Anil Deshmukh, Jitendra Awhad, Rohit Pawar among the campaigners. pic.twitter.com/RSkRhT085e
— ANI (@ANI) April 2, 2024
हेही वाचा
Lok Sabha Election : शरद पवार यांनी घेतली मल्लिकार्जून खर्गेंची भेट; हरयाणामधील करनालच्या जागेबाबत महत्त्वपूर्ण चर्चा
दिंडोरीतून भास्कर भगरे यांना उमेदवारी; अखेर शरद पवार गटाचा सस्पेन्स संपला
Lok Sabha Election : राष्ट्रवादी शरद पवार गटाची लोकसभेसाठी पहिली यादी जाहीर
Latest Marathi News राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या ४० स्टार प्रचारकांची यादी जाहीर Brought to You By : Bharat Live News Media.