महाराष्ट्रातील पहिल्या टप्प्याच्या निवडणूक प्रचारासाठी काँग्रेसचे स्टार प्रचारक जाहीर
नवी दिल्ली, Bharat Live News Media वृत्तसेवा : काँग्रेसने लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील पहिल्या टप्प्याच्या निवडणूक प्रचारासाठी ४० स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली. यात काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, काँग्रेस संसदीय पक्षाच्या नेत्या सोनिया गांधी, माजी अध्यक्ष राहुल गांधी, प्रियंका गांधी, महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात यांच्यासह पक्षाच्या प्रमुख नेत्यांचा समावेश आहे.
लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजल्यानंतर उमेदवार निश्चितीसह सर्वच राजकीय पक्षांनी स्टार प्रचारकांच्या याद्या तयार केल्या आहेत. काँग्रेसनेही महाराष्ट्रातील पहिल्या टप्प्याच्या निवडणूक प्रचारासाठी पक्षाच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली. यामध्ये एकूण ४० स्टार प्रचारक असून याच पक्षाच्या प्रमुख नेत्यांचा समावेश आहे. पक्षाचे संघटना सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली.
काँग्रेसच्या ४० स्टार प्रचारकांमध्ये कोण?
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, काँग्रेस संसदीय पक्षाच्या नेत्या सोनिया गांधी, माजी अध्यक्ष राहुल गांधी, प्रियंका गांधी, महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, राष्ट्रीय सरचिटणीस मुकुल वासनिक, राष्ट्रीय प्रवक्ते पवन खेडा, अविनाश पांडे, खासदार इमरान प्रतापगडी, माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष वर्षा गायकवाड, महिला काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा अध्यक्ष अलका लांबा, युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रीनिवास बी. व्ही, एनएसयुआयचे प्रभारी कन्हैया कुमार, एनएसयुआयचे राष्ट्रीय अध्यक्ष वरून चौधरी, माजी मंत्री सतेज पाटील, खासदार चंद्रकांत हंडोरे, माजी मंत्री यशोमती ठाकूर, शिवाजीराव मोघे, आरिफ नसीम खान, आमदार कुणाल पाटील, माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार, संजय निरुपम, नितीन राऊत, अमित देशमुख, विश्वजीत कदम, कुमार केतकर, भालचंद्र मुणगेकर, भाई जगताप, वसंत पुरके, मुझफ्फर हुसेन, अभिजीत वंजारी, अतुल लोंढे, अशोक पाटील, रामहरी रुपनवार यांचा समावेश आहे.
Latest Marathi News महाराष्ट्रातील पहिल्या टप्प्याच्या निवडणूक प्रचारासाठी काँग्रेसचे स्टार प्रचारक जाहीर Brought to You By : Bharat Live News Media.