Pune : बारामती शहर, तालुक्यात भाजपमध्ये नाराजी
बारामती : पुढारी वृत्तसेवा : बारामती शहर व तालुक्यात पदाधिकारी निवडी करताना वर्षानुवर्षे पक्षाचे निष्ठेने काम करणार्यांना डावलण्यात आले आहे. त्यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर पसरला आहे. बारामतीत राष्ट्रवादीचे प्राबल्य असताना काही लोकांनी भाजपची ताकद वाढवली. प्रस्थापितांशी संघर्ष केला. त्यांना डावलून निवडी करण्यात आल्या. या निवडीत त्यांचे मतही विचारात घेतले गेले नाही. यासंबंधी आम्ही वरिष्ठांकडेही भावना पोहोचवल्या असल्याचे भाजपच्या युवा मोर्चाचे माजी तालुकाध्यक्ष नितीन मदने यांनी सांगितले. शहर व तालुक्यात पक्ष मूठभर लोकांच्या हाती गेला आहे. पक्षासाठी कोणतेही योगदान नसणाऱ्यांना पदे दिली गेली. ज्यांच्या निवडी केल्या त्यांच्याबद्दल नागरिकच काय तर कार्यकर्तेदेखील अनभिज्ञ आहेत.
संबंधित बातम्या :
छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्याला पाणी सोडू नका; पाटबंधारेच्या पत्रानंतर मराठा समाज आक्रमक
Pune Metro : दिवाळीत मेट्रो प्रवासाला नागरिकांची पसंती
Pune : मंचर-शिरूर रस्त्यावर वळणांवर गतिरोधकाची मागणी
काही लोक दुसर्या तालुक्यातून येत प्रस्थापित झाले. वरिष्ठ नेत्यांची नावे वापरून काहींनी बारामतीत पक्ष संपवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. एकही कार्यकर्ता मागे नसणाऱ्यांना पदे दिली जात असल्याची खंत मदने यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. पक्षाची घटना, पक्ष संघटना, पक्षाची ध्येय धोरणे माहिती नसणाऱ्यांना पदे बहाल केली गेली आहेत. सक्षम टीम तयार करण्याची मोठी संधी पक्षासमोर होती. परंतु ती साधली गेली नाही. भाजपच्या कार्यकर्त्यांची दरमहा बैठक होते. केंद्र व प्रदेशस्तरावरून आलेल्या योजना, कार्यक्रम जनतेपर्यंत पोहोचविण्याचे नियोजन त्यात होते. आता पदे दिलेल्यांपैकी एकही आजवर या बैठकीला नव्हता. बारामती येथे पक्षातील काही वरिष्ठ वर्षानुवर्षे सोयीचे राजकारण करत आले आहेत. त्यांच्या दुटप्पीपणामुळे भाजप कार्यकर्ता अस्वस्थ झाला आहे. अन्य पक्षाकडे जातो आहे.
लोकसभा व विधानसभा निवडणुका तोंडावर असताना पक्षबांधणीकडे लक्ष देण्यापेक्षा पक्ष अधिक कमकुवत केला जात असल्याचा आरोप मदने यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांनी केला. पक्ष संघटनेत डावलल्याने मध्यंतरी एका पदाधिकार्याने पक्षाचे काम थांबवत असल्याचेही सोशल मीडियावर जाहीर केले. तरीही वरिष्ठ या प्रकाराची दखल घेत नसल्याची खदखद कार्यकर्त्यांच्या मनात आहे.
The post Pune : बारामती शहर, तालुक्यात भाजपमध्ये नाराजी appeared first on पुढारी.
बारामती : पुढारी वृत्तसेवा : बारामती शहर व तालुक्यात पदाधिकारी निवडी करताना वर्षानुवर्षे पक्षाचे निष्ठेने काम करणार्यांना डावलण्यात आले आहे. त्यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर पसरला आहे. बारामतीत राष्ट्रवादीचे प्राबल्य असताना काही लोकांनी भाजपची ताकद वाढवली. प्रस्थापितांशी संघर्ष केला. त्यांना डावलून निवडी करण्यात आल्या. या निवडीत त्यांचे मतही विचारात घेतले गेले नाही. यासंबंधी आम्ही वरिष्ठांकडेही …
The post Pune : बारामती शहर, तालुक्यात भाजपमध्ये नाराजी appeared first on पुढारी.