जळगाव : ट्रक मागे घेताना धडक लागल्याने सुरक्षा रक्षकाचा मृत्यू
जळगाव : कंपनीत माल उतरविण्यासाठी आलेला ट्रक मागे घेत असतांना सुरक्षा रक्षकाला धडक लागली. या धडकेत सुरक्षा रक्षक गंभीर जखमी झाले. उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी एमआयडीसी पोलिसात ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटना एमआयडीसीमधील एम स्टेक्टरमधील जीबी इंडस्ट्रिजमध्ये गुरुवारी दुपारी घडली. उपचार सुरु असतांना सुकदेव आनंदा सापकर (वय ६५, रा. तुळजाईनगर कुसुंबा) यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी ट्रकचालकाविरुद्ध एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तालुक्यातील तुळजाई नगरात सुकदेव आनंदा सापकर (वय ६५, रा. तुळजाईनगर कुसुंबा) हे एमआयडीसीतील एम सेक्टरमधील जीबी इंडस्ट्रीजमध्ये सुरक्षा रक्षक म्हणून नोकरी करीत होते. कंपनीत एमएच २८ बीबी ५३९९ या क्रमांकाचा ट्रक माल उतरविण्यासाठी आला होता. ट्रक मागे घेत असतांना कंपनीच्या गेटवर ड्युटी करीत असलेल्या सापकर यांना धडक लागल्याने ते गंभीर जखमी झाले. दरम्यान, कामगारांनी त्यांना तात्काळ खासगी रुग्णालयात दाखल केले. याठिकाणी त्यांच्यावर उपचार सुरु असतांना सुकदेव आनंदा सापकर यांचं मृत्यू झाला. ज्ञानेश्र्वर हरणकर यांनी दिलेल्या तक्रारीवरुन ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा :
Adani-Hindenburg case | गुंतवणूकदारांच्या सुरक्षेसाठी काय केले? SC चा SEBI ला सवाल
परदेशातही लावले महिला ढोल-ताशा पथकाने वेड!
Devendra Phadanavis : देवेंद्र फडणवीस यांनी घेतले लक्ष्मी-नृसिंहाचे दर्शन
The post जळगाव : ट्रक मागे घेताना धडक लागल्याने सुरक्षा रक्षकाचा मृत्यू appeared first on पुढारी.
जळगाव : कंपनीत माल उतरविण्यासाठी आलेला ट्रक मागे घेत असतांना सुरक्षा रक्षकाला धडक लागली. या धडकेत सुरक्षा रक्षक गंभीर जखमी झाले. उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी एमआयडीसी पोलिसात ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटना एमआयडीसीमधील एम स्टेक्टरमधील जीबी इंडस्ट्रिजमध्ये गुरुवारी दुपारी घडली. उपचार सुरु असतांना सुकदेव आनंदा सापकर (वय ६५, …
The post जळगाव : ट्रक मागे घेताना धडक लागल्याने सुरक्षा रक्षकाचा मृत्यू appeared first on पुढारी.