Pune Metro : दिवाळीत मेट्रो प्रवासाला नागरिकांची पसंती
पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : दिवाळीच्या सुटीत नागरिकांनी सहकुटुंब मेट्रो प्रवासाचा आनंद घेतला. त्यामुळे मेट्रोमध्ये नागरिकांची गर्दी झाली होती. नागरिकांचा मोठा प्रतिसाद लाभल्याने दिवाळीच्या काळात महामेट्रोच्या उत्पन्नात मोठी भर पडली आहे. 10 ते 15 नोव्हेंबर या सहा दिवसांत 57 हजार 854 नागरिकांनी प्रतिसाद दिला. त्यातून 12 लाख रुपयांचे उत्पन्न मेट्रोच्या तिजोरीत जमा झाले आहे.
पिंपरी येथील पिंपरी-चिंचवड महापालिका भवन स्टेशनला नागरिकांची सर्वांधिक पसंती मिळाली आहे. दिवाळीतील सहा दिवसांत या स्टेशनवरून तब्बल 35 हजार 727 नागरिकांनी प्रवास केला आहे.तर, लक्ष्मीपूजनाच्या दुसर्या दिवशी सोमवारी (दि. 13) सर्वाधिक 9 हजार 253 जणांनी मेट्रोची सफर केली. पिंपरी स्टेशन येथे सहा दिवसांत झालेल्या तिकीट विक्रीतून तब्बल 7 लाख 95 हजार 434 रुपयांचे उत्पन्न मिळाले. शहरातील 6 स्टेशनवर 57 हजार 854 नागरिकांनी मेट्रोतून प्रवास केला. एकूण 12 लाख 8 हजार 456 रुपयांची तिकीट विक्री झाली.
हेही वाचा
छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्याला पाणी सोडू नका; पाटबंधारेच्या पत्रानंतर मराठा समाज आक्रमक
Pune : खेड तालुक्यात सापडल्या 39 हजार 682 कुणबी नोंदी
परदेशातही लावले महिला ढोल-ताशा पथकाने वेड!
The post Pune Metro : दिवाळीत मेट्रो प्रवासाला नागरिकांची पसंती appeared first on पुढारी.
पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : दिवाळीच्या सुटीत नागरिकांनी सहकुटुंब मेट्रो प्रवासाचा आनंद घेतला. त्यामुळे मेट्रोमध्ये नागरिकांची गर्दी झाली होती. नागरिकांचा मोठा प्रतिसाद लाभल्याने दिवाळीच्या काळात महामेट्रोच्या उत्पन्नात मोठी भर पडली आहे. 10 ते 15 नोव्हेंबर या सहा दिवसांत 57 हजार 854 नागरिकांनी प्रतिसाद दिला. त्यातून 12 लाख रुपयांचे उत्पन्न मेट्रोच्या तिजोरीत जमा झाले आहे. पिंपरी …
The post Pune Metro : दिवाळीत मेट्रो प्रवासाला नागरिकांची पसंती appeared first on पुढारी.