करण जोहरची मोठी घोषणा; ‘स्टूडंट ऑफ द इयर ३’ बनणार वेबसिरीज

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड चित्रपट निर्माता करण जोहरने १२ वर्षांपूर्वी ‘स्टुडंट ऑफ द इयर’ ( Student of the Year ) हा धमाकेदार चित्रपट बनविला होता. या चित्रपटात बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट, वरुण धवन आणि सिद्धार्थ मल्होत्रा ​​यांनी दमदार अभिनयाची जादू दाखविली. या चित्रपटाने चाहत्याचे भरभरून प्रेम मिळाल्यानंतर ‘स्टुडंट ऑफ द इयर २’ चित्रपट लॉन्च … The post करण जोहरची मोठी घोषणा; ‘स्टूडंट ऑफ द इयर ३’ बनणार वेबसिरीज appeared first on पुढारी.
करण जोहरची मोठी घोषणा; ‘स्टूडंट ऑफ द इयर ३’ बनणार वेबसिरीज

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड चित्रपट निर्माता करण जोहरने १२ वर्षांपूर्वी ‘स्टुडंट ऑफ द इयर’ ( Student of the Year ) हा धमाकेदार चित्रपट बनविला होता. या चित्रपटात बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट, वरुण धवन आणि सिद्धार्थ मल्होत्रा ​​यांनी दमदार अभिनयाची जादू दाखविली. या चित्रपटाने चाहत्याचे भरभरून प्रेम मिळाल्यानंतर ‘स्टुडंट ऑफ द इयर २’ चित्रपट लॉन्च करण्यात आला. आता निर्माता करण जोहरने चित्रपटाच्या तिसऱ्या भागाबाबत एक मोठे अपडेट दिली आहे.
संबंधित बातम्या 

Crew Box Office Collection : तब्बू, करिना कपूर, क्रितीच्या ‘क्रू’चा विकेंडला धमाका; ३० कोटींच्या घरात
Janhvi Kapoor : ‘माझं तुझ्यावर प्रेम आहे…’;बोनी कपूरने जान्हवीच्या नात्याचा केला खुलासा
अभिनेता गोविंदा उमेदवार नव्हे, शिवसेनेचा स्टार प्रचारक, विदर्भातून प्रचाराला करणार सुरूवात          

करण जोहरने चंदीगड येथे आयोजित सिनेवेश्चर इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल (CIFF) मध्ये ‘स्टुडंट ऑफ द इयर ३’ बद्दल मोठी अपडेटस दिली आहे. यात करणने सांगितले की, ‘स्टुडंट ऑफ द इयर’चा तिसरा भाग लवकरच चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. हा चित्रपट नसून ही वेबसीरीज बनवण्यात येणार आहे. या वेबसीरीजचे दिग्दर्शन रीमा माया या करणार असून त्यानीच ‘SOTY 3’ वेब सिरीज म्हणून रिलीज करण्याची योजना आखली आहे.
नवीन दिग्दर्शक आणि लेखकांसोबत काम करण्याबद्दल बोलताना करण जोहर म्हणाला की, रीमा या ‘स्टुडंट ऑफ द इयर’ ( Student of the Year ) च्या डिजिटल व्हर्जनचे दिग्दर्शन करणार आहे. त्याच सर्व जबाबदारी पेलणार असून निश्चितपणे यश गाठतील असा विश्वास आहे.
कोण आहे रीमा माया?
रीमा माया या पुरस्कार विजेत्या लेखिका-दिग्दर्शिका आणि कॅटनिप प्रॉडक्शन हाऊसच्या सह-संस्थापक आहेत. त्या स्वतंत्र चित्रपट निर्मिती करतात. सनडान्स सारख्या चित्रपट महोत्सवात त्यांचे लघुपटांना चांगला प्रतिसाद मिळाला.
याआधी २०१२ मध्ये करण जोहरने ‘स्टुडंट ऑफ द इयर’ हा चित्रपटाची निर्मिती केली होती. आलिया भट्ट, वरुण धवन आणि सिद्धार्थ मल्होत्रा ​​यांना काम केलं होतं. मग त्यानीच ‘स्टुडंट ऑफ द इयर २’ चित्रपट बनविला, करणने निर्माता म्हणून जबाबदारी पेलली आणि दिग्दर्शक पुनित मल्होत्रा यांनी केलं होतं. दुसऱ्या भागात बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे, तारा सुतारिया आणि टायगर श्रॉफ दिसले होते. या चित्रपटाचा तिसरा भाग रीमा माया दिग्दर्शित करणार असल्याने पुनित मल्होत्राचा पत्ता कट झाला आहे.
तर करण जोहर ‘स्टुडंट ऑफ द इयर ३’ मध्ये शनाया कपूरला लॉन्च करणार असल्याची माहिती सनोर आली होती. शनाया ही संजय कपूर आणि महीप कपूर यांची मुलगी आहे. मोहनलाल यांच्या ‘वृषभ’ या चित्रपटातून शनाया अभिनय क्षेत्रात पदार्पण करणार आहे.
करणच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाल्यास त्याने शेवटचा ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ दिग्दर्शित केला होता. ज्यामध्ये आलिया भट्ट आणि रणबीर कपूर दिसले होते. करणचा ‘योधा’ चित्रपट प्रदर्शित झाला आहे.
 
Latest Marathi News करण जोहरची मोठी घोषणा; ‘स्टूडंट ऑफ द इयर ३’ बनणार वेबसिरीज Brought to You By : Bharat Live News Media.