चार मतदारसंघांवर मोहिते पाटलांचा प्रभाव

विजयसिंह मोहिते पाटील माढ्याच्या उमेदवारीवरून नाराज असल्याने धैर्यशील मोहिते पाटील यांच्या माध्यमातून मोहिते पाटलांनी उघडलेली बंडाची मोहीम केवळ माढ्यापुरती इफेक्ट करणार नसून माढ्यालगतच्या सोलापूर, बारामती, सातारा या मतदारसंघांवरही मोहिते पाटलांचा प्रभाव पडणार आहे. विजयसिंह मोहिते पाटील हे मूळचे काँग्रेस विचारांचे. शरद पवारांची सोबत केल्यानंतरही पवारांनी त्यांना राज्याच्या राजकारणात वरच्या क्रमांकाचे पद कधी दिले नाही. उलट … The post चार मतदारसंघांवर मोहिते पाटलांचा प्रभाव appeared first on पुढारी.

चार मतदारसंघांवर मोहिते पाटलांचा प्रभाव

– जीवनधर चव्हाण

विजयसिंह मोहिते पाटील माढ्याच्या उमेदवारीवरून नाराज असल्याने धैर्यशील मोहिते पाटील यांच्या माध्यमातून मोहिते पाटलांनी उघडलेली बंडाची मोहीम केवळ माढ्यापुरती इफेक्ट करणार नसून माढ्यालगतच्या सोलापूर, बारामती, सातारा या मतदारसंघांवरही मोहिते पाटलांचा प्रभाव पडणार आहे.
विजयसिंह मोहिते पाटील हे मूळचे काँग्रेस विचारांचे. शरद पवारांची सोबत केल्यानंतरही पवारांनी त्यांना राज्याच्या राजकारणात वरच्या क्रमांकाचे पद कधी दिले नाही. उलट माढ्याच्या लोकसभा निवडणुकीत 2019 साली पवारांनी मोहिते पाटलांना ठेंगा दाखवला. त्याचा परिणाम मोहिते पाटलांनी पवारांची साथ सोडली आणि ‘माढा राष्ट्रवादीला पाडा’ ही घोषणा त्यांनी कृतीत सिद्ध करून दाखवली. या निवडणुकीत भाजपच्या रणजितसिंह ना. निंबाळकर यांना विजयसिंह मोहिते पाटील यांच्या गटाने एक लाखाहून अधिक मतांंचे लीड दिले. त्यामुळे रणजितसिंह ना. निंबाळकर निवडून आले. त्यानंतर रणजितसिंह ना. निंबाळकर व मोहिते पाटील यांच्यात बेबनाव निर्माण झाला.
दोघांमधील वितुष्ट टोकाला गेले. आता तर दोघांमध्ये विस्तूही जात नाही. मोहिते पाटलांचा विरोध असतानाही 2024 च्या निवडणुकीत भाजपने रणजितसिंह ना. निंबाळकर यांना पुन्हा उमेदवारी दिली. या उमेदवारीवरून जोरदार रणकंदन सुरू आहे. मोहिते पाटील व रणजितसिंह ना. निंबाळकरांचे पारंपरिक विरोध रामराजे ना. निंबाळकर एक झाले. दोघांनीही आपापल्या मतदारसंघांमध्ये रणजितसिंह ना. निंबाळकर यांना विरोध केेला. रामराजे व मोहिते पाटील यांच्या विरोधाला शमवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. उमेदवारी बदलण्याची शक्यता अजिबात नाही. भाजप नेत्यांचीही तशी मानसिकता नाही. त्यामुळे मोहिते पाटील गट आणखी आक्रमक झाला आहे. त्यांनी तुतारीवर चाचपणी करायला सुरुवात केली आहे. मोहिते पाटील यांच्या नाराजीचा फटका केवळ माढ्यापुरता मर्यादित नाही.
सोलापूर जिल्ह्याचे मोहिते पाटील हे नेते आहेत. त्यांच्या नाराजीमुळे भाजपला सोलापूर मतदारसंघातही धोका निर्माण होऊ शकतो. माढ्यालगतच्या बारामतीत, माढ्यालगतच्या सातार्‍यात मोहिते पाटलांच्या गटाचा थोडाफार प्रभाव आहे. त्यामुळे चारही मतदार संघात मोहिते पाटील कुठे ना कुठे इफेक्ट करू शकतात. भाजप त्यामुळेच मोहिते पाटील यांची नाराजी दूर करण्याचे प्रयत्न करत आहे. अकलूजच्या धैर्यशील मोहिते पाटील यांनी शरद पवारांची साथ देण्याचा निर्णय घेतल्याने बारामती लोकसभा मतदारसंघातही सुप्रिया सुळे यांना याचा फायदा होऊ शकतो. इंदापूर तालुक्यातील निरा नदीकाठच्या गावात मोहिते यांचा प्रभाव आहे. अकलूजच्या सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखान्याचे तीन गट या भागात आहेत. या भागातील बर्‍यापैकी ऊस या कारखान्याला जातो. त्यामुळे मोहिते घराण्याशी येथील लोकांची नाळ जोडलेली आहे. निरा-नरसिंपूर, बावडा, सराटी, टण्णू, गिरवी, पिंपरी, लुमेवाडी, निर-निमगाव, थिटेवाडी, चाकाटी, रेडणी, चिखली, कुरूली, जांब या गावांमध्ये मोहिते यांना मानणारे मतदार आहेत. सुमारे 40 ते 50 हजार मतदार या भागात आहेत.
Latest Marathi News चार मतदारसंघांवर मोहिते पाटलांचा प्रभाव Brought to You By : Bharat Live News Media.