भारतीयांची चहाची तल्लफ पडली भारी; कोको कोला आता चहाही विकणार

पुढारी ऑनलाईन डेस्क : सॉफ्ट ड्रिंक्समधील जगातील मातब्बर कंपनी म्हणजे कोका कोला. कोका कोलाने भारतीयांच्या मनात घर करण्यासाठी आणि त्यांच्या फ्रिजमधील जागा जिंकण्यासाठी आतापर्यंत विविध प्रकारे प्रयत्न केले आहेत. पण भारतीयांची चहाची तल्लफ इतकी पॉवरबाज आहे, की त्यापुढे इतर कोणतेही पेय कमीच पडते. भारतीयांचे चहावरील प्रेम लक्षात घेत, कोका कोलाने आता चहा विकण्याचा निर्णय घेतला … The post भारतीयांची चहाची तल्लफ पडली भारी; कोको कोला आता चहाही विकणार appeared first on पुढारी.
#image_title

भारतीयांची चहाची तल्लफ पडली भारी; कोको कोला आता चहाही विकणार

पुढारी ऑनलाईन डेस्क : सॉफ्ट ड्रिंक्समधील जगातील मातब्बर कंपनी म्हणजे कोका कोला. कोका कोलाने भारतीयांच्या मनात घर करण्यासाठी आणि त्यांच्या फ्रिजमधील जागा जिंकण्यासाठी आतापर्यंत विविध प्रकारे प्रयत्न केले आहेत. पण भारतीयांची चहाची तल्लफ इतकी पॉवरबाज आहे, की त्यापुढे इतर कोणतेही पेय कमीच पडते. भारतीयांचे चहावरील प्रेम लक्षात घेत, कोका कोलाने आता चहा विकण्याचा निर्णय घेतला आहे. हा चहा रेडी टू ड्रिंक प्रकारातील असणार आहे. (Coca Cola Tea brand)
कोका कोलाची उपकंपनी ऑनेस्टी इन्कने भारतात ऑनेस्ट टी हा चहा लाँच केला आहे. हा चहा सेंद्रीय आणि ग्रीन टी प्रकारातील असणार आहे. दार्जिलिंग येथील सर्वांत जुने सेंद्रीय चहाचे मळे असलेल्या लक्ष्मी ग्रुपच्या मकाईबारी टी इस्टेटमधून हा चहा घेतला जाणार आहे. (Coca Cola Tea brand)
हिमालयाच्या पायथ्याशी असलेल्या तीव्र उतारावर वसलेले मकाईबारी हे दार्जिलिंगमधील सर्वात जुने ऑर्गेनिक चहाचे मळे आहेत. मकाईबारी येथे, बायोडायनॅमिक कृषी वातावरणात चहा काळजीपूर्वक निवडला जातो, जो दुर्मिळ चंद्रप्रकाशात खुडल्‍या जाणाऱ्या चहासाठी प्रसिद्ध आहे.
”दार्जिलिंगमध्ये मकईबारीपेक्षा मोठा चहाचा मळा नाही. जपान किंवा इंग्‍लंड असो किंवा राजघराणे असो सर्वांसाठी हा चहा सर्वोत्तम आहे,” असे कोलकाता-स्थित लक्ष्‍मी ग्रुपचे व्‍यवस्‍थापकीय संचालक रूद्र चॅटर्जी म्‍हणाले आहेत.
या नवीन लाँचबाबत मत व्‍यक्‍त करत कोका-कोला इंडिया व साऊथवेस्‍ट एशियाच्‍या हायड्रेशन, कॉफी व चहा विभागाच्‍या विपणनाचे संचालक कार्तिक सुब्रमण्‍यम म्‍हणाले, ”ही नवीन रेडी-टू-ड्रिंक आइस्‍ड ग्रीन टी सादर करण्‍याचा आनंद होत आहे. ऑनेस्‍ट टीसह आम्‍ही ग्राहकांना उत्तम स्‍वादिष्‍ट ग्रीन टी आधारित पेय भारतीयांना नक्कीच आवडेल.’
ऑनेस्‍ट टी लेमन-तुलसी व मँगो या दोन प्रकारात उपलब्ध असेल. निसर्गाशी सुसंगत राहत उत्‍पादित करण्‍यात येणाऱ्या ऑर्गनिक ग्रीन टीपासून तयार करण्‍यात आलेली ऑनेस्‍ट टी उत्तम स्‍वाद देते आणि उत्तम दर्जाच्‍या चहाच्‍या पानांपासून बनवण्‍यात आली आहे, असे कंपनीच्या वतीने सांगण्यात आले आहे.

ग्रीन टी आणि ब्लॅक टीमधील फरक माहितीय का? जाणून घ्‍या फायदे आणि तोटे…
ग्रीन टी किती वेळा प्यावा?
ग्रीन टी किती वेळा प्यावा?

 
The post भारतीयांची चहाची तल्लफ पडली भारी; कोको कोला आता चहाही विकणार appeared first on पुढारी.

पुढारी ऑनलाईन डेस्क : सॉफ्ट ड्रिंक्समधील जगातील मातब्बर कंपनी म्हणजे कोका कोला. कोका कोलाने भारतीयांच्या मनात घर करण्यासाठी आणि त्यांच्या फ्रिजमधील जागा जिंकण्यासाठी आतापर्यंत विविध प्रकारे प्रयत्न केले आहेत. पण भारतीयांची चहाची तल्लफ इतकी पॉवरबाज आहे, की त्यापुढे इतर कोणतेही पेय कमीच पडते. भारतीयांचे चहावरील प्रेम लक्षात घेत, कोका कोलाने आता चहा विकण्याचा निर्णय घेतला …

The post भारतीयांची चहाची तल्लफ पडली भारी; कोको कोला आता चहाही विकणार appeared first on पुढारी.

Go to Source