“हा केवळ ट्रेलर..!” गेल्या १० वर्षात देशातील अर्थव्यवस्थेत परिवर्तन, पीएम मोदींनी केले RBIचे कौतुक

पुढारी ऑनलाईन डेस्क : आज रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (RBI) एका ऐतिहासिक टप्प्यावर पोहचलीय. जगभरात RBI ची ओळख निर्माण झाली आहे. स्वातंत्र्यापूर्वी आणि स्वातंत्र्यानंतर प्रत्येक आर्थिक घटनेची RBI साक्षीदार आहे. गेल्या दहा वर्षात भारतातील बँकिंग प्रणालीत मोठा बदल झाला असून, हा केवळ ट्रेलर असून पिक्चर बाकी आहे, असे  म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी RBI चे … The post “हा केवळ ट्रेलर..!” गेल्या १० वर्षात देशातील अर्थव्यवस्थेत परिवर्तन, पीएम मोदींनी केले RBIचे कौतुक appeared first on पुढारी.
“हा केवळ ट्रेलर..!” गेल्या १० वर्षात देशातील अर्थव्यवस्थेत परिवर्तन, पीएम मोदींनी केले RBIचे कौतुक

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : आज रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (RBI) एका ऐतिहासिक टप्प्यावर पोहचलीय. जगभरात RBI ची ओळख निर्माण झाली आहे. स्वातंत्र्यापूर्वी आणि स्वातंत्र्यानंतर प्रत्येक आर्थिक घटनेची RBI साक्षीदार आहे. गेल्या दहा वर्षात भारतातील बँकिंग प्रणालीत मोठा बदल झाला असून, हा केवळ ट्रेलर असून पिक्चर बाकी आहे, असे  म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी RBI चे कौतुक केले आहे. पुढे आज पीएम मोदींनी (दि.१) वर्धापनदिनानिमित्त मी आरबीआयचे सर्व कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना पुढील संकल्पासाठी शुभेच्छा देतो, असे म्हटले आहे.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (RBI) स्थापनेला आज ९० वर्षे पूर्ण झाली. या निमित्त मुंबईतील आयोजित कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रमुख उपस्थिती होती. नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्टमध्ये या समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी RBI च्या या कार्यक्रमाला अर्थमंत्री निर्मला सीतारमण, RBI गव्हर्नर शक्तीकांत दास, महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार देखील उपस्थित होते. (RBI 90 years ceremony)
काँग्रेसच्या काळात बँकिंग क्षेत्र समस्यांमध्ये अडकली होती. परंतु गेल्या १० वर्षात उल्लेखनीय बदल झाले आहेत. आमच्या सरकारच्या काळात बँकिंग क्षेत्रात मोठी प्रगती झाली आहे. आमच्या नियम आणि निर्णयात स्पष्टता आल्यानेच हा बदल झाल्याचेदेखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केले.  (RBI 90 years ceremony)
गेल्या १० वर्षात बँकिंग व्यवस्था देशातील प्रत्येकापर्यंत पोहचली. देशातील ५२ कोटी जनधन खाती तयार झालीत. गेल्या १० वर्षात बँकिंग क्षेत्रात मोठ्या प्रमाणात डिजीटल ट्रान्सफटर्मेशन झाले आहे. जगभरात भारतातील बँकिंग क्षेत्राचे कौतुक होत आहे. आज UPI ला जागतिक मान्यता मिळतेय. अशाप्रकारे देशाची आर्थिक प्रगती वेगाने सुरू आहे. यापुढेदेखील अजून अनेक गोष्टी आपल्याला करायच्या आहेत. देशाला आणखी पुढे घेऊन जायचे आहे. यासाठी पुढच्या १० वर्षाचे लक्ष्य ठरलंय. आपल्या सगळ्यांना मिळून देशाला पुढे घेऊन जायचे आहे. भारताच्या प्रगतीसाठी RBI ला धोरणात्मक निर्णय घ्यावे लागतील. यासाठी सरकार आरबीआय सोबत नेहमी आहे, असा विश्वासदेखील पीएम मोदी यांनी RBI ला दिला. (RBI 90 years ceremony)

#WATCH | Mumbai: At the commemoration ceremony of 90 years of the Reserve Bank of India, PM Modi says, “This change has come because our policies, intentions and decisions were clear. Our efforts had stability and honesty. When the intentions are clear, then the policies are… pic.twitter.com/bmhJP3dPem
— ANI (@ANI) April 1, 2024

Latest Marathi News “हा केवळ ट्रेलर..!” गेल्या १० वर्षात देशातील अर्थव्यवस्थेत परिवर्तन, पीएम मोदींनी केले RBIचे कौतुक Brought to You By : Bharat Live News Media.