संतापजनक : कर्नाटकातील शाळेत ब्राह्मण मुलीला अंडे खायची जबरदस्ती

पुढारी ऑनलाईन डेस्क : कर्नाटकातील सरकारी शाळेत एका ब्राह्मण मुलीला जबरदस्तीने उकडलेले अंडे खायला दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पालकांनी तक्रार केल्यानंतर या प्रकरणात चौकशी सुरू झाली आहे. हा प्रकार शिमोगा येथील कर्नाटक पब्लिक स्कूलमध्ये उघडकीस आला आहे. ही शाळा गर्टिकेरे नजिक असलेल्या काम्माची या गावात आहे. (Brahmin Girl News) Brahmin Girl News: मुलीला मानसिक … The post संतापजनक : कर्नाटकातील शाळेत ब्राह्मण मुलीला अंडे खायची जबरदस्ती appeared first on पुढारी.
#image_title

संतापजनक : कर्नाटकातील शाळेत ब्राह्मण मुलीला अंडे खायची जबरदस्ती

पुढारी ऑनलाईन डेस्क : कर्नाटकातील सरकारी शाळेत एका ब्राह्मण मुलीला जबरदस्तीने उकडलेले अंडे खायला दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पालकांनी तक्रार केल्यानंतर या प्रकरणात चौकशी सुरू झाली आहे. हा प्रकार शिमोगा येथील कर्नाटक पब्लिक स्कूलमध्ये उघडकीस आला आहे. ही शाळा गर्टिकेरे नजिक असलेल्या काम्माची या गावात आहे. (Brahmin Girl News)
Brahmin Girl News: मुलीला मानसिक धक्का
ही मुलगी दुसरीच्या वर्गात शिकते. ही मुलगी शाकाहारी असतानाही वर्ग शिक्षकांनी तिला जबरदस्तीने अंडे खायला लावले. संबंधित शिक्षकाचे नाव पुट्टास्वामी असल्याचे निष्पन्न झाले आहे. अंडे खाल्ल्यानंतर ही मुलगी आजारी पडली आणि तिला मानसिक धक्का बसल्याचे तिचे वडील व्ही श्रीकांत यांनी म्हटले आहे. श्रीकांत या शाळेत हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना शिकवतात. मुलगी शाकाहारी आहे, त्यामुळे तिला मध्यान भोजनात चिक्की द्यावी, याची स्पष्ट कल्पना त्यांनी शाळेच्या प्रशासनाला दिली होती. (Brahmin Girl News)
कुटुंबाच्या धार्मिक भावना दुखावल्या
शिक्षकाने अंडे खायला लावल्यानंतर या मुलीने घरी येऊन या प्रकार सांगितला. त्यानंतर श्रीकांत यांनी शिक्षणाधिकाऱ्यांकडे रीतसर तक्रार नोंदवली आहे. कुटुंबाच्या धार्मिक भावना दुखावल्याचे त्यांनी या तक्रारीत म्हटले आहे. संबंधित शिक्षकाने माफी मागितली असल्याचे ‘टाइम्स ऑफ इंडिया‘च्या बातमीत म्हटले आहे. (Brahmin Girl News)
हेही वाचा:

Sachin Waze : एन्काऊंटर स्पेशालिस्ट सचिन वाझे यांना ‘झुमका’ला घ्यायचे आहे दत्तक, कोर्टात अर्ज
54th IFFI : अभिनय म्हणजे वास्तविक जीवनातील भूमिकेची पुनर्निमिती : पंकज त्रिपाठी
Devendra Phadanavis : देवेंद्र फडणवीस यांनी घेतले लक्ष्मी-नृसिंहाचे दर्शन

The post संतापजनक : कर्नाटकातील शाळेत ब्राह्मण मुलीला अंडे खायची जबरदस्ती appeared first on पुढारी.

पुढारी ऑनलाईन डेस्क : कर्नाटकातील सरकारी शाळेत एका ब्राह्मण मुलीला जबरदस्तीने उकडलेले अंडे खायला दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पालकांनी तक्रार केल्यानंतर या प्रकरणात चौकशी सुरू झाली आहे. हा प्रकार शिमोगा येथील कर्नाटक पब्लिक स्कूलमध्ये उघडकीस आला आहे. ही शाळा गर्टिकेरे नजिक असलेल्या काम्माची या गावात आहे. (Brahmin Girl News) Brahmin Girl News: मुलीला मानसिक …

The post संतापजनक : कर्नाटकातील शाळेत ब्राह्मण मुलीला अंडे खायची जबरदस्ती appeared first on पुढारी.

Go to Source