बारामती येथील 22 चौकांत जाहिरात फलकांना बंदी
बारामती : पुढारी वृत्तसेवा : बारामती शहरात जाहिरात फलकांमुळे होत असलेले विद्रूपीकरण, फलक लावणार्यांवरून होणारे वाद यामुळे नगरपरिषदेने आता शहरातील 22 चौकांत जाहिरात फलक लावण्यास परवानगी न देण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी ही माहिती दिली. बारामती शहरात जाहिरात फलक आणि कमानी उभ्या करण्याची गेल्या काही महिन्यांत चढाओढ लागली आहे. यातून वादाचे प्रसंग उद्भवू लागले आहेत. हे टाळण्यासाठी आता पालिकेने यासंबंधी नव्याने नियमावली तयार केली आहे. पालिकेने निश्चित केलेल्या 22 चौकांत कोणी जाहिरात फलक, जाहिरात प्रदर्शित केल्यास त्यांच्यावर महाराष्ट्र सार्वजनिक मालमत्ता विद्रूपीकरण कायदा, भारतीय दंड संहिता आणि प्रचलित कायद्यानुसार फौजदारी कारवाई केली जाणार आहे. ही कारवाई केवळ फलक लावणार्यांवरच नव्हे, तर त्याच्याबरोबरच प्रिटिंग फर्म, दुकानदार, संबंधित मंडप, फ्लेक्स, कमान बांधणी करणारे यांच्यावरही होईल, असा इशारा देण्यात आला आहे.
संबंधित बातम्या :
DA Hike : सरकारी कर्मचार्यांच्या महागाई भत्त्यात ४ टक्के वाढ
Pune : खेड तालुक्यात सापडल्या 39 हजार 682 कुणबी नोंदी
Pune : मंचर-शिरूर रस्त्यावर वळणांवर गतिरोधकाची मागणी
या 22 चौकांखेरीज अन्य ठिकाणी जाहिरात फलक, कमान उभी करायची असेल, तर त्यासाठीही नियमावली जाहीर करण्यात आली आहे. अन्य ठिकाणी जाहिरातींना परवानगी देताना वाहनचालकांच्या डोळ्यावर तिरीप येईल एवढ्या प्रखरतेची रोषणाई केलेले फलक, दोन किंवा दोनपेक्षा जास्त रस्ते एकत्र मिळतात अशा ठिकाणी, थांबा रेषेपासून समोरील बाजूस 25 मीटर एवढ्या अंतराच्या आत जमिनीवर उभारलेल्या जाहिरात फलकांची दर्शनी बाजू, सार्वजनिक खुली जागा, मनोरंजनाची मैदाने, क्रीडांगणे, उद्याने, रस्त्यावर कोणतेही फिरती जाहिरात प्रदर्शनासाठी वाहन उभे करण्याची परवानगी दिली जाणार नाही.
महत्त्वपूर्ण ठिकाणीदेखील बंदी
पुरातत्त्वीय, वास्तुशास्त्रीय, सौंदर्यशास्त्रीय व ऐतिहासिक, वारसागामी महत्त्व असलेल्या इमारतीवर, नदीपात्र, तलाव, जलाशय आदी ठिकाणी जाहिरात फलक लावता येणार नाहीत. तसेच इमारतीच्या गच्चीवर, पदपथावर व सार्वजनिक रस्त्यावरही परवानगी दिली जाणार नाही.
हे चौक जाहिरातींसाठी नाहीत
बारामती शहरातील भिगवण चौक, तीन हत्ती चौक, सुभाष चौक, गांधी चौक, इंदापूर चौक (अहिल्यादेवी होळकर चौक), गुणवडी चौक, छत्रपती शिवाजी चौक, ढवाण पाटील चौक (फलटण रस्ता), अण्णा भाऊ साठे चौक, राजर्षी शाहू चौक, सिद्धार्थनगर चौक, मार्केट यार्ड चौक, कदम चौक, सातव चौक, देशमुख चौक, पंचायत समिती चौक, श्रीरामनगर चौक, औद्योगिक वसाहत चौक, हॉटेल अभिषेक चौक, सिटी इन चौक, जिल्हा क्रीडा संकुल चौक आणि कारभारी सर्कल चौक.
The post बारामती येथील 22 चौकांत जाहिरात फलकांना बंदी appeared first on पुढारी.
बारामती : पुढारी वृत्तसेवा : बारामती शहरात जाहिरात फलकांमुळे होत असलेले विद्रूपीकरण, फलक लावणार्यांवरून होणारे वाद यामुळे नगरपरिषदेने आता शहरातील 22 चौकांत जाहिरात फलक लावण्यास परवानगी न देण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी ही माहिती दिली. बारामती शहरात जाहिरात फलक आणि कमानी उभ्या करण्याची गेल्या काही महिन्यांत चढाओढ लागली आहे. यातून वादाचे प्रसंग …
The post बारामती येथील 22 चौकांत जाहिरात फलकांना बंदी appeared first on पुढारी.