Pune : खेड तालुक्यात सापडल्या 39 हजार 682 कुणबी नोंदी

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनानंतर राज्य शासनाचे आदेश मिळताच दिवाळी सुट्टीतही दिवसरात्र काम करून महसूल प्रशासनाने लाखो अभिलेखांची तपासणी करून कुणबी नोंदी शोध मोहीम हाती घेतली. एकट्या खेड तालुक्यात तहसीलदार प्रशांत बेडसे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व महसूल कर्मचार्‍यांनी पंधरा दिवसात तब्बल 5 लाख 8703 अभिलेखांची तपासणी केली. यामध्ये जिल्ह्यातील सर्वाधिक म्हणजे … The post Pune : खेड तालुक्यात सापडल्या 39 हजार 682 कुणबी नोंदी appeared first on पुढारी.
#image_title

Pune : खेड तालुक्यात सापडल्या 39 हजार 682 कुणबी नोंदी

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनानंतर राज्य शासनाचे आदेश मिळताच दिवाळी सुट्टीतही दिवसरात्र काम करून महसूल प्रशासनाने लाखो अभिलेखांची तपासणी करून कुणबी नोंदी शोध मोहीम हाती घेतली. एकट्या खेड तालुक्यात तहसीलदार प्रशांत बेडसे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व महसूल कर्मचार्‍यांनी पंधरा दिवसात तब्बल 5 लाख 8703 अभिलेखांची तपासणी केली. यामध्ये जिल्ह्यातील सर्वाधिक म्हणजे 39 हजार 682 कुणबी नोंदी सापडल्या. या सर्व नोंदी शासनाच्या संकेतस्थळावर अपलोड करण्यात आल्या असल्याची माहिती बेडसे यांनी दिली. खेड तालुक्यातील कुणबी नोंदी शोधण्यासाठी दिवाळी सुट्टी असताना सर्व कर्मचारी दिवसरात्र काम करत होते. काही गावांमध्ये मोठ्या प्रमाणात, तर काही गावांत अत्यंत तुरळक नोंदी आढळून आल्या. या सर्व नोंदी सरकारी बेवसाइटवर अपलोड करण्याचे कामही सुरू आहे.
जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार तालुक्यात कुणबी नोंदी शोधमोहीम राबविण्यात आली. यात आतापर्यंत 39 हजार 682 नोंदी आढळून आल्या असून, ही सर्व कागदपत्रे स्कॅन करण्याचे काम सुरू आहे. आता 38 हजार971 नोंदीचे स्कॅनचे काम पूर्ण झाले आहे. तर शिक्षण विभागाच्या 711 नोंदी आढळून आल्या असून, जिल्हा परिषद शाळांना दिवाळी सुट्टी असल्याने नोंदी स्कॅन करणे बाकी आहे.
                                                             – प्रशांत बेडसे, तहसीलदार, खेड
The post Pune : खेड तालुक्यात सापडल्या 39 हजार 682 कुणबी नोंदी appeared first on पुढारी.

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनानंतर राज्य शासनाचे आदेश मिळताच दिवाळी सुट्टीतही दिवसरात्र काम करून महसूल प्रशासनाने लाखो अभिलेखांची तपासणी करून कुणबी नोंदी शोध मोहीम हाती घेतली. एकट्या खेड तालुक्यात तहसीलदार प्रशांत बेडसे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व महसूल कर्मचार्‍यांनी पंधरा दिवसात तब्बल 5 लाख 8703 अभिलेखांची तपासणी केली. यामध्ये जिल्ह्यातील सर्वाधिक म्हणजे …

The post Pune : खेड तालुक्यात सापडल्या 39 हजार 682 कुणबी नोंदी appeared first on पुढारी.

Go to Source