मुस्कटदाबी थांबवा; इंडिया आघाडीची मागणी

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : ईडी, सीबीआय, आयकर विभाग यांना हाताशी धरून सरकारने सुरू केलेली मुस्कटदाबी थांबवावी. विरोधी पक्षांतील नेत्यांवर केलेली कारवाई देशाच्या लोकशाहीसाठी चिंंताजनक आहे. तुरुंगात असलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांची तत्काळ सुटका करावी, अशी मागणी इंडिया आघाडीच्या नेत्यांनी केली. रविवारी रामलीला मैदानावर लोकतंत्र बचाव रॅलीच्या निमित्ताने एकवटलेल्या … The post मुस्कटदाबी थांबवा; इंडिया आघाडीची मागणी appeared first on पुढारी.

मुस्कटदाबी थांबवा; इंडिया आघाडीची मागणी

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : ईडी, सीबीआय, आयकर विभाग यांना हाताशी धरून सरकारने सुरू केलेली मुस्कटदाबी थांबवावी. विरोधी पक्षांतील नेत्यांवर केलेली कारवाई देशाच्या लोकशाहीसाठी चिंंताजनक आहे. तुरुंगात असलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांची तत्काळ सुटका करावी, अशी मागणी इंडिया आघाडीच्या नेत्यांनी केली. रविवारी रामलीला मैदानावर लोकतंत्र बचाव रॅलीच्या निमित्ताने एकवटलेल्या विरोधकांनी भाजप सरकारविरोधात एल्गार पुकारत शक्तिप्रदर्शन केले.
महारॅलीमध्ये महाराष्ट्रातून माजी मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार सहभागी झाले. त्यांच्यासोबत ‘उबाठा’चे नेते आदित्य ठाकरे आणि संजय राऊतसुद्धा होते. इंडिया आघाडीच्या रॅलीमध्ये मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता यांनी केजरीवालांनी दिलेला संदेश वाचून दाखवला. रॅलीसाठी काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान, उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव, काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला, मेहबुबा मुफ्ती, बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव, डेरेक ओब्रायन, सीताराम येचुरी, डी राजा, कल्पना सोरेन आदी नेत्यांनी भाषणातून भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडले.
ही तर मॅच फिक्सिंग : राहुल गांधी
काँग्रेस नेते राहुल गांधी म्हणाले की, अंपायरवर दबाव टाकून, खेळाडू विकत घेऊन, कर्णधाराला धमकावून सामना जिंकला जातो. त्याला क्रिकेटमध्ये मॅच फिक्सिंग म्हणतात. देशात लोकसभा निवडणुका होणार आहेत. अशा परिस्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंच म्हणून स्वतःच्या मर्जीतील लोक नेमले. सामना सुरू होण्यापूर्वी आमच्या संघातील दोन खेळाडूंना अटक करून आत टाकण्यात आले. मोदी या निवडणुकीत मॅच फिक्सिंग करत आहेत. जनतेने पूर्ण ताकदीनिशी मतदान केले नाही तर मॅच फिक्सिंग यशस्वी होईल, असे ते म्हणाले. मॅच फिक्सिंग झाले तर संविधान संपेल. ही निवडणूक काही सामान्य निवडणूक नाही. ही निवडणूक देश, राज्यघटना आणि गरीब आणि शेतकर्‍यांच्या हक्कांचे रक्षण करणारी आहे.
लोकशाहीवर हल्ला : शरद पवार
शरद पवार म्हणाले, दिल्ली आणि झारखंडच्या मुख्यमंत्र्यांच्या विरोधात ज्या प्रकारे भाजप सरकारने कारवाई केली, ती देशाच्या लोकशाहीवर आणि देशाच्या संविधानावर हल्ला आहे. लोकशाही आणि घटना वाचवण्यासाठी आज एकत्र येऊन मुकाबला करण्याची गरज आहे.
अब की बार भाजप तडीपार : उद्धव ठाकरे
महारॅलीला संबोधित करताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले, तुम्ही (कल्पना सोरेन आणि सुनीता केजरीवाल) काळजी करू नका. फक्त आम्हीच नाही तर संपूर्ण देश तुमच्यासोबत आहे. काही दिवसांपूर्वी आपला देश हुकूमशाहीकडे वाटचाल करतोय की काय अशी भीती होती. पण आता ही भीती खरी ठरली आहे. देशवासीयांनी भाजपचे खरे रूप ओळखले आहे. ते आता लढणार आहेत. यावेळी ‘अब की बार भाजप तडीपार’ असा नाराही ठाकरे यांनी दिला.
समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनीही मोदी सरकारवर निशाणा साधत म्हटले की, जर तुम्हाला 400 पारचा आत्मविश्वास असेल तर आम आदमी पक्षाच्या नेत्याला का घाबरता? राजदचे नेते तेजस्वी यादव म्हणाले, बेरोजगारी, महागाई, गरिबी यावर मोदी सरकारने काहीच केले नाही.
सगळे घटक पक्ष एकत्र : खर्गे
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले की, ‘इंडिया’ आघाडी भारताच्या विविधतेतील एकतेच्या भावनेचे प्रतिनिधित्व करते. आघाडीच्या घटक पक्षांमध्ये स्थानिक आणि राज्य पातळीवर काही मतभेद असू शकतात. मात्र राष्ट्रीय हिताचे रक्षण करण्याच्या विचारासाठी सर्व घटक पक्ष एकत्र असतात. भाजप सरकार विरोधी पक्षांना समान पातळीवर लढण्याची संधी नाकारत असल्याचा आरोपही त्यांनी केला. काँग्रेस पक्षाची सर्व बँक खाती निवडणुकीच्या वेळीच कशी गोठवली गेली, देशातील विरोधी पक्षाच्या दोन मुख्यमंत्र्यांना बरोबर निवडणुकीच्या आधीच कशी अटक होते, असा सवालही त्यांनी विचारला.
‘आप’चे शक्तिप्रदर्शन
विरोधी पक्षांच्या ‘इंडिया’ आघाडीने रविवारी दिल्लीतील रामलीला मैदानावर ‘लोकशाही वाचवा’ सभेच्या निमित्ताने जोरदार शक्तिप्रदर्शन केले. ‘आप’चे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दिल्लीतील मद्यधोरण गैरव्यवहार प्रकरणात ईडीने अटक केल्याच्या निषेधार्थ ही सभा असल्याचे ‘आप’ने सांगितले. काँग्रेसने मात्र विरोधी पक्ष भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या ‘हुकूमशाही’ विरोधात आवाज उठवण्यासाठी एकत्र आल्याचे सांगितले. त्यामुळे एकाच सभेचे दोन वेगवेगळे निमित्त दिसून आले.
शहरात असे राहणार दर (चौरस मीटरमध्ये)
* व्हीनस कॉर्नर ते दाभोळकर कॉर्नर : खुली जागा (37,530 चौरस मीटर), निवासी इमारत (45,040 चौरस मीटर), वरील मजल्यावरील कार्यालये (59,630 रुपये चौरस मीटर), तळमजल्यावरील दुकाने/व्यावसायिक (1,62,510 रुपये चौरस मीटर)
* राजारामपुरी मेन रोड क्रमांक 1 : खुली जागा (34,250), निवासी इमारत (49,900), वरील मजल्यावरील कार्यालये (57,390), तळमजल्यावरील दुकाने/व्यावसायिक (68,720)
* ताराबाई पार्क, सिंचन भवन परिसर : खुली जागा (18,550), निवासी इमारत (43,980), वरील मजल्यावरील कार्यालये (50,580), तळमजल्यावरील दुकाने/व्यावसायिक (56,740)
* महाद्वार रोड, ताराबाई रोड ते गुजरी कॉर्नर : खुली जागा (58,440), निवासी इमारत (60,400), वरच्या मजल्यावरील कार्यालय/ व्यावसायिक (73,370), तळमजल्यावरील दुकाने/व्यावसायिक (1,30,900).
The post मुस्कटदाबी थांबवा; इंडिया आघाडीची मागणी appeared first on Bharat Live News Media.

Go to Source