हिंगोली : महाविकास आघाडीच्या बैठकीस दिग्गजांची दांडी: आष्टीकरांसमोर नाराजी दूर करण्याचे आव्हान

हिंगोली; पुढारी वृत्तसेवा : एकीकडे महायुतीमध्ये भाजपने खासदार हेमंत पाटील यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेत त्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला आहे. तर महाविकास आघाडीमध्येही सर्व काही अलबेल असल्याचे दिसून येत नाही. आज (दि.३१) पार पडलेल्या महाविकास आघाडीच्या बैठकीस घटक पक्षातील दिग्गज नेत्यांनीच दांडी मारल्याने धुसफूस चव्हाट्यावर आली आहे. त्यामुळे लोकसभेसाठी नवखे असलेले उमेदवार नागेश पाटील आष्टीकर … The post हिंगोली : महाविकास आघाडीच्या बैठकीस दिग्गजांची दांडी: आष्टीकरांसमोर नाराजी दूर करण्याचे आव्हान appeared first on पुढारी.

हिंगोली : महाविकास आघाडीच्या बैठकीस दिग्गजांची दांडी: आष्टीकरांसमोर नाराजी दूर करण्याचे आव्हान

हिंगोली; Bharat Live News Media वृत्तसेवा : एकीकडे महायुतीमध्ये भाजपने खासदार हेमंत पाटील यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेत त्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला आहे. तर महाविकास आघाडीमध्येही सर्व काही अलबेल असल्याचे दिसून येत नाही. आज (दि.३१) पार पडलेल्या महाविकास आघाडीच्या बैठकीस घटक पक्षातील दिग्गज नेत्यांनीच दांडी मारल्याने धुसफूस चव्हाट्यावर आली आहे. त्यामुळे लोकसभेसाठी नवखे असलेले उमेदवार नागेश पाटील आष्टीकर गोत्यात आले आहेत. त्यांना दिग्गज नेत्यांची नाराजी दूर करण्यात कितपत यश येईल, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. Lok Sabha Election 2024
महाविकास आघाडीकडून ठाकरे गटासह काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून अनेकजण इच्छुक होते. परंतु, नागेश पाटील यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडल्यानंतर महाविकास आघाडीची कुरबुरी समोर येऊ लागली आहे. दोन दिवसांपूर्वीच कळमनुरी विधानसभा मतदार संघातील बहुतांश काँग्रेस कार्यकर्त्यांनी काँग्रेसवर अन्याय झाल्याचा दावा करीत पदाचे सामुहिक राजीनामे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे पाठविले होते. Lok Sabha Election 2024
काँग्रेसच्या आमदार प्रज्ञा सातव, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर, ठाकरे गटाचे माजी मंत्री जयप्रकाश मुंदडा, रूपाली पाटील गोरेगावकर यांच्यासह अनेक पदाधिकार्‍यांनी बैठकीकडे पाठ फिरविली. त्यामुळे नागेश पाटील आष्टीकर यांच्या अडचणी वाढल्या आहेत.
बैठकीस राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दिलीप चव्हाण, माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दिलीप देसाई, मुनीर पटेल, जी.डी. मुळे, विनायक भिसे, गोपू पाटील, संदेश देशमुख, डॉ. मारोती क्यातमवार, शेख निहाल यांच्यासह महाविकास आघाडीतील घटक पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते. बैठकीत एकदिलाने आष्टीकर यांचे काम करण्याचा निर्णय घेण्यात आला असला तरी निर्णय प्रक्रियेत महत्वाचे स्थान असलेल्या दिग्गजांची गैरहजेरी बरेच काही सांगून जाते.
Lok Sabha Election 2024 सातव समर्थकांची अनुपस्थिती चर्चेत
बैठकीस आमदार प्रज्ञा सातव यांच्यासह स्व.राजीव सातव यांचे समर्थकही अनुउपस्थित राहिल्याने बैठक स्थळी वेगळी चर्चा सुरू होती. स्व.राजीव सातव यांनी हिंगोली लोकसभा मतदार संघात कार्यकर्त्यांचे संघटन मजबुत केले होते. त्यांना मानणारा मोठा वर्ग आजही कायम आहे. परंतु, आजच्या बैठकीस त्यांचे सर्वच समर्थक अनुउपस्थित राहिले. ठाकरे गटाच्या कुटुंब संवाद कार्यक्रमात कळमनुरी येथे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कळमनुरी विधानसभेवरही भगवा फडकविण्याचा दावा केल्याने काँग्रेसचे कार्यकर्ते नाराज झाले. लोकसभा ठाकरे गटाला व विधानसभाही ठाकरे गटाला सोडल्यास काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी नेमके करायचे काय ? असा प्रश्‍नही उपस्थित होऊ लागला आहे. परिणामी त्याचे पडसाद बैठकीत दिसून आले.
हेही वाचा 

हिंगोली लोकसभेसाठी हेमंत पाटील फायनल! शिवसेना शिंदे गटाकडून उमेदवारी जाहीर
Hingoli Lok Sabha Election : हेमंत पाटील यांच्या उमेदवारीला भाजपचा विरोध; शिष्टमंडळ फडणवीसांना भेटणार
Hingoli Lok Sabha Constituency: हिंगोली लोकसभेच्या जागेवरून काँग्रेस–ठाकरे गटात जुंपणार ?

Latest Marathi News हिंगोली : महाविकास आघाडीच्या बैठकीस दिग्गजांची दांडी: आष्टीकरांसमोर नाराजी दूर करण्याचे आव्हान Brought to You By : Bharat Live News Media.