यंदा वार्षिक बाजार मूल्यदरात कोणतीही वाढ नाही

कसबा बावडा : पुढारी वृत्तसेवा : प्रत्येक वर्षी १ एप्रिलरोजी शासनाच्या मुद्रांक विभागाकडून नवीन वार्षिक बाजार मूल्य दर निश्चित करून त्याची अंमलबजावणी केली जाते. यावर्षी वार्षिक बाजार मूल्य दरामध्ये काही बदल होतील, अशी अपेक्षा होती. परंतु, सन २०२४-२५ या आर्थिक वर्षामध्ये वार्षिक बाजार मूल्य दरामध्ये कोणतेही बदल झालेले नाहीत. सन २०२३-२४ चे बाजार मूल्यदर पुढे … The post यंदा वार्षिक बाजार मूल्यदरात कोणतीही वाढ नाही appeared first on पुढारी.

यंदा वार्षिक बाजार मूल्यदरात कोणतीही वाढ नाही

कसबा बावडा : Bharat Live News Media वृत्तसेवा : प्रत्येक वर्षी १ एप्रिलरोजी शासनाच्या मुद्रांक विभागाकडून नवीन वार्षिक बाजार मूल्य दर निश्चित करून त्याची अंमलबजावणी केली जाते. यावर्षी वार्षिक बाजार मूल्य दरामध्ये काही बदल होतील, अशी अपेक्षा होती. परंतु, सन २०२४-२५ या आर्थिक वर्षामध्ये वार्षिक बाजार मूल्य दरामध्ये कोणतेही बदल झालेले नाहीत. सन २०२३-२४ चे बाजार मूल्यदर पुढे कायम ठेवण्यात आले आहेत.
मुख्य नियंत्रक महसूल प्राधिकारी तथा नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक (महाराष्ट्र राज्य, पुणे) हे आर्थिक वार्षिक बाजार मुल्यदर तक्ते तयार करतात. महाराष्ट्र मुद्रांक (मिळकतीचे वास्तव बाजार मूल्य निश्चित करणे) नियम, १९९५ मधील नियम ४ च्या उप- नियम (९) च्या तरतुदी अन्वये उप सचिव यांना वर्ष २०२३-२४ चे वार्षिक दर विवरणपत्र कोणताही बदल न करता वर्ष २०२४-२५ मध्ये चालू ठेवण्यात यावे, असे कळविण्याचे शासनाचे निर्देश असल्याचे उपसचिव सत्यनारायण बजाज यांनी पत्राद्वारे कळवले आहे.
सन २०२२-२३, २०२३-२४ व आता १ एप्रिलपासून २०२४-२५ सालासाठी तेच वार्षिक बाजार मूल्य दर कायम राहणार आहेत. तीन वर्ष वार्षिक बाजार मूल्य दरामध्ये कोणताही बदल झालेले नाहीत.
हेही वाचा 

Latest Marathi News यंदा वार्षिक बाजार मूल्यदरात कोणतीही वाढ नाही Brought to You By : Bharat Live News Media.