वाशिम: रिसोडमधून मजुरांचे रोजगारासाठी स्थलांतर; वाड्या-वस्त्या ओसाड

वाशिम: रिसोड तालुक्यातील रोजगाराचा प्रश्न हा कायमच मजुरांच्या चटणी-भाकरीची परवड करणारा ठरत आलेला आहे. शासनाने महात्मा गांधी रोजगार हमी योजने अंतर्गत येथील रोजगाराचा प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु येथील ठेकेदारी, कमीशन पध्दतीने मनरेगाचा रोजगार हा ख-या मजुरांसाठी मृगजळ ठरत आहे. त्यामुळे मजुरांना रोजगारासाठी स्थलांतर करावे लागत आहे. अनेक वाडी-वस्त्या ओसाड पडत असल्याचे विदारक चित्र … The post वाशिम: रिसोडमधून मजुरांचे रोजगारासाठी स्थलांतर; वाड्या-वस्त्या ओसाड appeared first on पुढारी.

वाशिम: रिसोडमधून मजुरांचे रोजगारासाठी स्थलांतर; वाड्या-वस्त्या ओसाड

अजय ढवळे

वाशिम: रिसोड तालुक्यातील रोजगाराचा प्रश्न हा कायमच मजुरांच्या चटणी-भाकरीची परवड करणारा ठरत आलेला आहे. शासनाने महात्मा गांधी रोजगार हमी योजने अंतर्गत येथील रोजगाराचा प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु येथील ठेकेदारी, कमीशन पध्दतीने मनरेगाचा रोजगार हा ख-या मजुरांसाठी मृगजळ ठरत आहे. त्यामुळे मजुरांना रोजगारासाठी स्थलांतर करावे लागत आहे. अनेक वाडी-वस्त्या ओसाड पडत असल्याचे विदारक चित्र तालुक्यात पाहायला मिळत आहे. Washim News
रिसोड तालुक्यात सुमारे शंभर गावे असून ३ ओसाड गावांचा समावेश आहे. बहुतांश गावातील मुख्य व्यवसाय शेती आहे. शेतीला मजुरांची नितांत गरज भासते. परंतु, अनेकदा मजुराला मजुरीचा योग्य मोबदला मिळत नाही. त्यामुळे तो रोजंदारीकडे पाठ फिरवतो. शेती व्यवसायाला मोठ्या प्रमाणात यांत्रिकीकरणाची जोड मिळाली आहे. परंतु मजुरीचे दर माणूस पाहून कमी जास्त केले जातात. त्यामुळे मजुरांचा हिरमोड होतो. Washim News
शासनाने मजुरांच्या हाताला काम मिळण्यासाठी सिंचन विहिरी, पांदण रस्ते, अशा विविध कामे ग्रामीण भागात सुरू केली आहेत. परंतु, बहुतांश मनरेगाच्या कामातील ठेकेदार कुशल-अकुशल कामाचे प्रमाण गुंडाळून ठेवतात. घंटो का काम मिनटो में करतात. अर्थात रातोरात पांदण रस्त्यांची कामे जेसीबी, पोकलँडद्वारे करून घेतात. त्यामुळे मजुरांना काम मिळत नाही. कुशल कामाचे बिल हे मजुरांच्या जॉबकार्डने काढले जाते. संबंधित ठेकेदार अशा मजुरांना मनरेगाच्या कामावर दाखवतात. आणि बिले काढून घेतात. असा प्रकार शासकीय अधिकाऱ्यांच्या मूक सहमतीने राजरोसपणे सुरू आहे. त्यामुळे गरजवंत मजूर वर्ग रोजगारापासून वंचित राहतो. त्यामळे कामाच्या शोधात त्याला स्थलांतर करणे भाग पडत आहे.
हेही वाचा 

वाशिम : कारंजा ते अमरावती रस्त्यावर कारमध्ये ३६ लाखांची रक्कम; स्थिर सर्वेक्षण पथकाची कारवाई
वाशिम: किन्हीराजा येथे दुचाकीची ट्रकला धडक; बापलेक ठार, एक गंभीर जखमी
वाशिम: नगर परिषदेच्या थकबाकीदार गाळेधारकांवर धडक कारवाई

Latest Marathi News वाशिम: रिसोडमधून मजुरांचे रोजगारासाठी स्थलांतर; वाड्या-वस्त्या ओसाड Brought to You By : Bharat Live News Media.