कडूस : Bharat Live News Media वृत्तसेवा : आखरवाडी ( ता. खेड ) येथे ऊस तोडणीदरम्यान ऊसाच्या शेतात आढळून आलेले बिबट्याच्या तीनही बछड्यांना मादी बिबट्याने सुरक्षित स्थळी नेले. वनविभागाच्या तत्परतेने या बछड्यांना जिवदान मिळाले. या कामी वनपाल म्हातारबा वाघुले, वनरक्षक संतोष भागडे, अंकुश गुट्टे, शिवाजी ढोले, राजाराम सातकर यांनी महत्वाची भूमिका बजावली.
आखरवाडी येथे शुक्रवारी (दि. २९) बाळासाहेब तनपुरे यांच्या शेतात ऊस तोडणी सुरू असताना मजुरांना बिबट्याचे तीन बछडे आढळून आले होते. याबाबत माहिती मिळताच वनविभागाने संबंधित बछडे ताब्यात घेतले. त्यांची वैद्यकिय तपासणी करुन त्यांना पुन्हा सापडलेल्या ठिकाणी रात्री ठेवून दिले. रात्री मादी बिबट्या संबंधित ठिकाणी आली आणि तिने एक एक करुन आपल्या तीनही बछड्यांना सुरक्षित स्थळी नेले.
राजगुरूनगर वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदिप रौंधळ म्हणाले, बछड्यांची माहिती मिळाल्यावर वन विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. प्रथम बछडे ताब्यात घेतले. व रात्री पुन्हा जेथे सापडले तेथे त्यांना ठेवण्यात आले. पहाटेच्या वेळेस बिबट मादी तेथे आली. तिने बछड्यांचा अंदाज घेतला. व एक एक करत तीनही बछडे सुरक्षित स्थळी नेले.
हेही वाचा
पुणे: बोरी खुर्द येथे उसाच्या शेतात आढळले बिबट्याचे बछडे
पुणे: पिंपळवंडी येथे बिबट्यांच्या हल्ल्यात तीन शेळ्या मृत्यूमुखी
पुणेकरांनो काळजी घ्या ! शहराने गाठली तापमानाची ‘चाळीशी’!
Latest Marathi News पुणे: आखरवाडीतील ‘ते’ बछडे पुन्हा विसावले आईच्या कुशीत Brought to You By : Bharat Live News Media.