अभिनेता सनी देओलचे तिकीट भाजपने कापले

अभिनेता सनी देओलचे तिकीट भाजपने कापले

नवी दिल्ली : वृत्तसंस्था : भाजपने लोकसभा निवडणुकीसाठी शनिवारी आपल्या उमेदवारांची आठवी यादी जाहीर केली. या यादीत 3 राज्यांतील 11 उमेदवारांची नावे आहेत. पंजाबातील गुरुदासपुरातून अभिनेता सनी देओल ( Sunny Deol ) यांचे तिकीट कापण्यात आले आहे.
सनी देओलऐवजी ( Sunny Deol ) गुरुदासपुरातून यावेळी दिनेशसिंह बब्बू यांना उमेदवारी देण्यात आली आहे. बिजू जनता दलातून भाजपमध्ये दाखल झालेल्या भर्तृहरी मेहताब यांनाही उमेदवारी देण्यात आली आहे. मेहताब यांच्यासह ओडिशातून 3, पंजाबातून 6 आणि पश्चिम बंगालमधून 2 उमेदवारांच्या नावांची घोषणा झाली आहे. ओडिशातील जाजपूर, कंधहाल, कटक येथून अनुक्रमे रवींद्र बेहरा, सुकांत पाणीग्रही आणि भतृहरी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या तिन्ही मतदारसंघांतील विद्यमान खासदारांची तिकिटे कापण्यात आली आहेत. आठव्या यादीसह भाजपने आजअखेर 417 उमेदवारांची घोषणा केली आहे.
माजी राजदूतास उमेदवारी
पंजाबातील जालंधरहून सुशील रिंकू, लुधियानाहून रवनीतसिंह बिट्टू, पतियाळाहून परनीत कौर, फरिदकोटहून हंसराज हंस हे उमेदवार असतील. अमृतसरहून अमेरिकेतील भारताचे माजी राजदूत तरणजितसिंह संधू यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
 
The post अभिनेता सनी देओलचे तिकीट भाजपने कापले appeared first on Bharat Live News Media.

Go to Source