खडकवासला : सोनापूर पुलाला अखेर मिळाला मुहूर्त!

खडकवासला : पुढारी वृत्तसेवा : कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर होऊनही पुणे- पानशेत रस्त्यावरील सोनापूर येथील रखडलेल्या पुलाच्या कामाला अखेर मुहूर्त मिळाला. याबाबत दै.‘पुढारी’ने वृत्त प्रसिद्ध केले होते. त्याची दखल घेत प्रशासनाने हे काम सुरू केल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. खडकवासला धरण तीरालगत खोदकाम करून पुलाचे काम करण्यात येत आहे. पानशेत, वरसगाव धरण भागासह वेल्हे, … The post खडकवासला : सोनापूर पुलाला अखेर मिळाला मुहूर्त! appeared first on पुढारी.
#image_title

खडकवासला : सोनापूर पुलाला अखेर मिळाला मुहूर्त!

खडकवासला : पुढारी वृत्तसेवा : कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर होऊनही पुणे- पानशेत रस्त्यावरील सोनापूर येथील रखडलेल्या पुलाच्या कामाला अखेर मुहूर्त मिळाला. याबाबत दै.‘पुढारी’ने वृत्त प्रसिद्ध केले होते. त्याची दखल घेत प्रशासनाने हे काम सुरू केल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. खडकवासला धरण तीरालगत खोदकाम करून पुलाचे काम करण्यात येत आहे.
पानशेत, वरसगाव धरण भागासह वेल्हे, पश्चिम हवेली व मुळशी या तीन तालुक्यांना जोडणारा पुणे- पानशेत हा प्रमुख रस्ता आहे. एका बाजूला डोंगर व दुसर्‍या बाजूला खडकवासला धरणाचे पाणलोट क्षेत्र असल्याने या ठिकाणी गेल्या अनेक वर्षांपासून पूल व दोन्ही बाजूचा रस्ता खचत आहे. दोन वर्षांपूर्वी जोरदार पावसात पुलासह रस्ता वाहून जाऊन पानशेत वरसगाव भागाचा काही दिवस संपर्क तुटला होता. खडकवासला धरण व दुसर्‍या बाजूला डोंगर आहे.
त्यामुळे येथून पर्यायी रस्ताही तयार करता येत नाही. त्यामुळे या ठिकाणी आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने पुलाची उभारणी करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. धरणाच्या पाण्याच्या लगत असलेल्या जमिनीत लोखंडी जाळ्या बसवून संरक्षित कठडे उभारण्याचे काम सध्या सुरू आहे. मात्र, हे संथगतीने काम सुरू असल्याने नियोजित वेळेत काम पूर्ण करण्याचे मोठे आव्हान सार्वजनिक बांधकाम विभागासमोर उभे आहे.
खचलेल्या पुलामुळे होणार्‍या गैरसोयींकडे स्थानिक आमदार भीमराव तापकीर यांनी थेट विधिमंडळात सरकारचे लक्ष वेधले होते. त्यानंतर शासनाने पुलासाठी तब्बल पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. गेल्या दोन वर्षांपासून याठिकाणी एकेरी वाहतूक सुरू आहे.
अनेक वर्षांपासून या ठिकाणी पूल, रस्ता खचत आहे. त्यामुळे वरवर मलमपट्टी न करता कायमस्वरुपी टिकेल असा पूल उभारण्यासाठी शासनाकडून पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. अधिकार्‍यांसमवेत पाहणी करून कामाची माहिती घेण्यात आली. निविदेप्रमाणे दर्जेदार काम करण्याच्या सूचना संबंधित अधिकार्‍यांना दिल्या आहेत.
-भीमराव तापकीर, आमदार
खडकवासला धरणातील पाण्याच्या लाटा रस्त्याच्या भागातील जमिनीला आदळत असल्याने पूल व लगतचा रस्ता खचत आहे. त्यामुळे तांत्रिक बाबींची पूर्तता करून पुलाचे काम केले जात आहे. टिकाऊ लोखंडी जाळ्या साहित्याच्या साह्याने तीरालगत संरक्षित रेलिंग कठडे उभे करून मजबूतीकरण करण्यात येत आहे. हे काम वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित ठेकेदाराला दिल्या आहेत.
-अमोल पवार, कार्यकारी
अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग

हेही वाचा
सावधान ! अँटिबायोटिकचा अतिवापर करताय?
सिंधुदुर्ग : नांदगाव- पाटीलवाडीत भरधाव कारचे नियंत्रण सुटून अपघात; युवती जखमी
Flower export : फूलशेती निर्यातीतून ३५२ कोटींचे परकीय चलन
 
The post खडकवासला : सोनापूर पुलाला अखेर मिळाला मुहूर्त! appeared first on पुढारी.

खडकवासला : पुढारी वृत्तसेवा : कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर होऊनही पुणे- पानशेत रस्त्यावरील सोनापूर येथील रखडलेल्या पुलाच्या कामाला अखेर मुहूर्त मिळाला. याबाबत दै.‘पुढारी’ने वृत्त प्रसिद्ध केले होते. त्याची दखल घेत प्रशासनाने हे काम सुरू केल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. खडकवासला धरण तीरालगत खोदकाम करून पुलाचे काम करण्यात येत आहे. पानशेत, वरसगाव धरण भागासह वेल्हे, …

The post खडकवासला : सोनापूर पुलाला अखेर मिळाला मुहूर्त! appeared first on पुढारी.

Go to Source