भारतीय विद्यार्थ्याची अमेरिकेत कारमध्ये गोळ्या झाडून हत्या

पुढारी ऑनलाईन : अमेरिकेच्या ओहायो राज्यात २६ वर्षीय भारतीय वैद्यकीय विद्यार्थ्याची कारमध्ये गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. आदित्य अदलाखा (Aaditya Adlakha) असे त्याचे नाव आहे. ही घटना धक्कादायक आणि दुःखद असल्याचे सिनसिनाटी मेडिकल स्कूलने म्हटले आहे. WXIX-TV च्या वृत्तानुसार, वैद्यकीय संस्थेने जारी केलेल्या निवेदनानुसार आदित्य अदलाखा हा सिनसिनाटी मेडिकल स्कूल विद्यापीठातील आण्विक आणि विकासात्मक जीवशास्त्र … The post भारतीय विद्यार्थ्याची अमेरिकेत कारमध्ये गोळ्या झाडून हत्या appeared first on पुढारी.
#image_title

भारतीय विद्यार्थ्याची अमेरिकेत कारमध्ये गोळ्या झाडून हत्या

पुढारी ऑनलाईन : अमेरिकेच्या ओहायो राज्यात २६ वर्षीय भारतीय वैद्यकीय विद्यार्थ्याची कारमध्ये गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. आदित्य अदलाखा (Aaditya Adlakha) असे त्याचे नाव आहे. ही घटना धक्कादायक आणि दुःखद असल्याचे सिनसिनाटी मेडिकल स्कूलने म्हटले आहे. WXIX-TV च्या वृत्तानुसार, वैद्यकीय संस्थेने जारी केलेल्या निवेदनानुसार आदित्य अदलाखा हा सिनसिनाटी मेडिकल स्कूल विद्यापीठातील आण्विक आणि विकासात्मक जीवशास्त्र अभ्यासक्रमच्या चौथ्या वर्षात शिकत होता. (Indian student shot dead in US)
हॅमिल्टन काउंटी कोरोनर्स कार्यालयाच्या म्हणण्यानुसार, अदलाखा यांचा या महिन्याच्या सुरुवातीला यूसी मेडिकल सेंटरमध्ये मृत्यू झाला. ९ नोव्हेंबर रोजी सिनसिनाटी पोलिस विभागातील ले. जोनाथन कनिंगहॅम म्हणाले होते की, वेस्टर्न हिल्स व्हायाडक्टच्या वरच्या डेकवरील भिंतीवर धडकलेल्या एका वाहनाच्या आत एक व्यक्ती मृतावस्थेत आढळला होता. त्याला गोळी लागली होती.
गनफायर लोकेटर सर्व्हिस शॉटस्पॉटरने सकाळी ६:२० च्या सुमारास परिसरात गोळीबार झाल्याची माहिती दिली होती, असे पोलिसांनी सांगितले. कनिंगहॅम यांनी सांगितले की, ज्या वाहनात अदलाखा मृतावस्थेत आढळून आला होता त्यावर गोळ्या झाडल्याच्या खुना दिसल्याची माहिती पोलिसांना ९११ वर एका चालकाने फोनवरुन दिली होती.
अदलाखा याला गंभीर जखमी अवस्थेत उपचारासाठी यूसी मेडिकल सेंटरमध्ये नेण्यात आले होते. पण दोन दिवसांनंतर त्याला मृत घोषित करण्यात आले. गोळीबार झाल्याची माहिती मिळाल्यापासून अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही, असे स्थानिक माध्यमांनी म्हटले आहे.
उच्च शिक्षणासाठी गेला होता अमेरिकेत
अदलाखा उच्च शिक्षणासाठी भारतातून अमेरिकेत गेला होता. त्याने २०१८ मध्ये दिल्ली विद्यापीठाच्या रामजस महाविद्यालयातून प्राणीशास्त्रातून पदवी मिळवली होती. २०२० मध्ये त्याने नवी दिल्ली येथील ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसमधून फिजियोलॉजी विषयात पदव्युत्तर पदवी प्राप्त केली होती. त्यांच्या वाहनाला अनेकवेळा धडक देण्यात आली. ड्रायव्हरच्या बाजूच्या खिडकीत किमान तीन गोळ्या झाडल्याच्या खुन्या दिसून आल्या आहेत. (Indian student shot dead in US)
हे ही वाचा :

अफगाणिस्तान भारतीय दूतावास कायमस्वरूपी बंद करणार
भारताकडून कॅनडाच्या नागरिकांसाठी ई-व्हिसा सेवा पुन्हा सुरु
८ माजी नौदल अधिकाऱ्यांच्या फाशीविरोधातील अपील कतारने स्वीकारले

The post भारतीय विद्यार्थ्याची अमेरिकेत कारमध्ये गोळ्या झाडून हत्या appeared first on पुढारी.

पुढारी ऑनलाईन : अमेरिकेच्या ओहायो राज्यात २६ वर्षीय भारतीय वैद्यकीय विद्यार्थ्याची कारमध्ये गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. आदित्य अदलाखा (Aaditya Adlakha) असे त्याचे नाव आहे. ही घटना धक्कादायक आणि दुःखद असल्याचे सिनसिनाटी मेडिकल स्कूलने म्हटले आहे. WXIX-TV च्या वृत्तानुसार, वैद्यकीय संस्थेने जारी केलेल्या निवेदनानुसार आदित्य अदलाखा हा सिनसिनाटी मेडिकल स्कूल विद्यापीठातील आण्विक आणि विकासात्मक जीवशास्त्र …

The post भारतीय विद्यार्थ्याची अमेरिकेत कारमध्ये गोळ्या झाडून हत्या appeared first on पुढारी.

Go to Source