धक्कादायक ! कोरोना काळात पुणे महापालिकेत गैरव्यवहार

पुणे : पुढारी वृत्तसेवा : कोरोना काळात महापालिकेच्या वारजे येथील रुग्णालयातील कोरोना चाचणी साहित्य, तसेच अन्य वैद्यकीय साहित्याची परस्पर खासगी रोगनिदान केंद्र चालकांना विक्री करुन ८० ते ९० लाखांची फसवणूक केल्याच्या आरोपावरून आरोग्य अधिकारी डाॅ. आशिष भारती यांच्यासह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी आरोग्य अधिकारी डाॅ. आशिष भारती, डाॅ. अरुणा सूर्यकांत तायडे, डाॅ. … The post धक्कादायक ! कोरोना काळात पुणे महापालिकेत गैरव्यवहार appeared first on पुढारी.
#image_title

धक्कादायक ! कोरोना काळात पुणे महापालिकेत गैरव्यवहार

पुणे : पुढारी वृत्तसेवा : कोरोना काळात महापालिकेच्या वारजे येथील रुग्णालयातील कोरोना चाचणी साहित्य, तसेच अन्य वैद्यकीय साहित्याची परस्पर खासगी रोगनिदान केंद्र चालकांना विक्री करुन ८० ते ९० लाखांची फसवणूक केल्याच्या आरोपावरून आरोग्य अधिकारी डाॅ. आशिष भारती यांच्यासह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी आरोग्य अधिकारी डाॅ. आशिष भारती, डाॅ. अरुणा सूर्यकांत तायडे, डाॅ. ऋषीकेश हनुमंत गार्डी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सतीश बाबुराव काळसुरे (वय ४२) यांनी वारजे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार शासनाची फसवणूक, तसेच अपहार केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वारजे भागात महापालिकेचे अरविंद बारटक्के रुग्णालय आहे. २०२१ मध्ये करोना काळात बारटक्के रुग्णालयात करोना चाचणी साहित्य,ओैषधे, जंतूनाशक, तसेच अन्य वैद्यकीय साहित्य पुरविण्यात आले होते. बारटक्के रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डाॅ. तायडे, गार्डी आणि महापालिकेचे आरोग्य अधिकारी डाॅ. भारती यांनी नागरिकांच्या करोना चाचणीबाबतची बनावट नोंदी केली. नागरिकांची करोना तपासणी करण्यात आली, असे भासविले.
प्रत्यक्षात त्यांनी शाससाने उपलब्ध करुन दिलेल्या वैद्यकीय साहित्याची परस्पर खासगी रोगनिदान केंद्र चालकांना करुन ८० ते ९० लाखांची फसवणूक केल्याचे काळसुरे यांनी तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणी काळसुरे चौकशीची मागणी केली होती. त्यांनी न्यायालयात खासगी फौजदारी तक्रार दिली होती. न्यायालयाने या प्रकरणात गुन्हा दाखल करुन सखोल चाैकशी करण्याचे आदेश पाेलिसांना दिले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील जैतापूरकर तपास करत आहेत
हेही वाचा
Flower export : फूलशेती निर्यातीतून ३५२ कोटींचे परकीय चलन
सावधान ! अँटिबायोटिकचा अतिवापर करताय?
Pune : पानशेत रस्त्यावरील सोनापूर पुलाचे काम सुरू
The post धक्कादायक ! कोरोना काळात पुणे महापालिकेत गैरव्यवहार appeared first on पुढारी.

पुणे : पुढारी वृत्तसेवा : कोरोना काळात महापालिकेच्या वारजे येथील रुग्णालयातील कोरोना चाचणी साहित्य, तसेच अन्य वैद्यकीय साहित्याची परस्पर खासगी रोगनिदान केंद्र चालकांना विक्री करुन ८० ते ९० लाखांची फसवणूक केल्याच्या आरोपावरून आरोग्य अधिकारी डाॅ. आशिष भारती यांच्यासह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी आरोग्य अधिकारी डाॅ. आशिष भारती, डाॅ. अरुणा सूर्यकांत तायडे, डाॅ. …

The post धक्कादायक ! कोरोना काळात पुणे महापालिकेत गैरव्यवहार appeared first on पुढारी.

Go to Source