Pune : गराडेत केवळ 77 टक्के साठा ; पाणी जपून वापरण्याचे आवाहन
सासवड : पुढारी वृत्तसेवा : पुरंदर तालुक्यात महत्त्वाचे असणारे गराडे धरणात सध्या केवळ 77 टक्के पाणीसाठा आहे. याशिवाय माहूर 74, वीरनाला 69 टक्के भरले आहे. सासवड शहराला वीर, गराडे, सिद्धेश्वर जलाशय व घोरवडी धरणातून पाणी पुरवठा केला जातो. गराडे धरण 65.37 दशलक्ष घनफूट क्षमतेचा असून 77 टक्के भरले आहे, असे गराडे पाटबंधारे शाखा अभियंता अविनाश जगताप
यांनी सांगितले. घोरवडी धरणात सध्या 14 टक्के पाणीसाठा आहे. या धरणातून दिवे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत सुपे खुर्द, पिंपळे व पोमणनगर या ग्रामपंचायतींना तसेच सासवड नगरपरिषदेला पाणीपुरवठा केला जातो. धरणातील पाण्याची स्थिती पाहता यावर्षी सासवडकरांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. सासवड शहराला पाणीपुरवठा करणारे घोरवडी धरणाने तळ गाठला आहे. परिणामी शहराला दिवसाआड पाणीपुरवठा केला जात असल्याची माहिती सासवड नगरपालिकेचे पाणीपुरवठा अभियंता संकेत नंदवंशी यांनी दिली.
संबंधित बातम्या :
Flower export : फूलशेती निर्यातीतून ३५२ कोटींचे परकीय चलन
Afghanistan Embassy : अफगाणिस्तान भारतीय दूतावास कायमस्वरूपी बंद करणार
सिंधुदुर्ग : नांदगाव- पाटीलवाडीत भरधाव कारचे नियंत्रण सुटून अपघात; युवती जखमी
गराडे धरणातून गराडे, कोडीत बुद्रुक व खुर्द, चांबळी व हिवरे आदी गावांना शेतीसाठी पाणीपुरवठा केला जातो. पिण्याचे पाणी सासवड शहर, कोडीत खुर्द व बुद्रुक, चांबळी व हिवरेसह इतर वाड्या-वस्त्यांना पुरविले जाते. मात्र या सर्वच धरणांची पाणीपातळी खालावली असल्याने शेतकर्यांसह जनसामान्यांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागण्याची दाट शक्यता आहे.
गुरुवारपर्यंतची जलाशयाची माहिती (अनुक्रमे)- तलाव, पाणी साठवण क्षमता (दशलक्ष घनफूट), टक्केवारी (कंसामध्ये) : प गराडे, 65.37, (77); प घोरवडी, 67.50, (14); प पिंगोरी, 20, (32); प पिलाणवाडी, 69.22, (39); प माहूर, 84, (74); प वीरनाला, 90.21, (69).
चार्याचा प्रश्न अतितीव्र
पुरंदर तालुक्यातील पश्चिम भागात पावसाने ओढ दिल्याने दुष्काळाचे संकट आहे. सध्या पिण्याच्या पाण्याबरोबरच जनावरांच्या चार्याचा प्रश्न तीव्र झाला आहे. शेतशिवारातील पिके करपली असून नदी, नाले, तलाव कोरडे पडले आहेत. हिरवा चारा संपला असून, सुका चाराही संपत आल्याने दूध उत्पादन निम्म्यापेक्षा अधिक घटले आहे. त्यामुळे दुग्धव्यवसाय तोट्यात असून, जनावरे सांभाळणे शेतकर्यांना जिकिरीचे झाले आहे. यामुळे पुरंदरचा शेतकरी चिंतेत पडला आहे.
पुरंदर तालुक्यात सध्या गंभीर दुष्काळी परिस्थिती आहे. सासवड शहरात नागरिकांनी पिण्याच्या व वापरण्याच्या पाण्याची टंचाई लक्षात घेऊन पाण्याची काटकसर करून नगरपरिषदेला सहकार्य करावे. गावठाण, हाडको, सोनोरी रोड, वाढीव हद्द, विविध सोसायट्या आदींचे वेळापत्रक स्थानिक पातळीवर सुरू आहे. नागरिकांनी जपून पाणी वापरावे.
डॉ. कैलास चव्हाण, मुख्याधिकारी, सासवड नगरपरिषद
The post Pune : गराडेत केवळ 77 टक्के साठा ; पाणी जपून वापरण्याचे आवाहन appeared first on पुढारी.
सासवड : पुढारी वृत्तसेवा : पुरंदर तालुक्यात महत्त्वाचे असणारे गराडे धरणात सध्या केवळ 77 टक्के पाणीसाठा आहे. याशिवाय माहूर 74, वीरनाला 69 टक्के भरले आहे. सासवड शहराला वीर, गराडे, सिद्धेश्वर जलाशय व घोरवडी धरणातून पाणी पुरवठा केला जातो. गराडे धरण 65.37 दशलक्ष घनफूट क्षमतेचा असून 77 टक्के भरले आहे, असे गराडे पाटबंधारे शाखा अभियंता अविनाश जगताप …
The post Pune : गराडेत केवळ 77 टक्के साठा ; पाणी जपून वापरण्याचे आवाहन appeared first on पुढारी.