उन्हाच्या झळा तीव्र..! अयोध्येतील राम मूर्तीला परिधान केला सुती पोशाख
Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क: गेल्या काही दिवसांपासून देशभरात उन्हाचा पारा वाढला आहे. उन्हापासून बचावासाठी सुती हलक्या आणि पांढरी कपडे परिधान केली जात आहेत. भरपूर पाणी पिणे, उन्हात डोळ्यांच्या सुरक्षेसाठी गॉगल वापरणे, थंड पेये पिणे यांसारखे विविध उपाय केले जात आहेत. दरम्यान, वाढत्या उन्हाळ्यामध्ये अयोध्येतील रामलल्लांनी देखील विशेष काळजी घेण्यास सुरूवात करण्यात आली आहे. (Ayodhya summer season)
उन्हाळा सुरू झाल्याने आणि वाढत्या तापमानामुळे अयोध्या मंदिरात रामलल्ला मूर्तीला शनिवारपासून आरामदायी सुती पोशाख परिधान करण्यास सुरूवात झाली आहे. या पोशाखातील फोटो श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र यांनी एक्स अकाऊंटवर पोस्ट केले आहेत. (Ayodhya summer season)
Ayodhya Temple’s Ram Lalla adorns handloom cotton clothes ahead of summer season
Read @ANI Story | https://t.co/2Teg6gANIb#Ayodhya #ramlalla #summer #cotton pic.twitter.com/Az7JtonFf2
— ANI Digital (@ani_digital) March 30, 2024
अयोध्येतील प्रभू रामांनी जी वस्त्रे परिधान केली आहेत. ती ‘हातमागाच्या सुती मलमलने बनलेली आहेत, नैसर्गिक निळीने रंगलेली आहेत आणि फुलांनी सजवलेली आहेत’. यामध्ये हलक्या वजनाच्या आणि श्वास घेण्यायोग्य फॅब्रिककडे जाणीवपूर्वक लक्ष देण्यात आले आहे. पुढील काही महिने वापरता येण्यासाठी रामाच्या आरामासाठी विचारपूर्वक ही वस्त्रे बनवण्यात आली आहेत. (Ayodhya summer season)
रामलल्ला, प्रभू रामाचे बालरूप दर्शवणारी 51 इंची मूर्ती, ज्याला प्रेमाने “बालक राम” म्हणून ओळखले जाते. ती म्हैसूर येथील ख्यातनाम कारागीर अरुण योगीराज यांनी बनवली आहे. दुर्मिळ अशा तीन अब्ज वर्ष जुन्या काळ्या दगडातून ही अयोध्येतील रामल्लाची मूर्ती साकारली आहे. या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा 22 जानेवारी 2024 रोजी मोठ्या उत्साहात पार पडला. या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला देशभरातील विविध क्षेत्रातील दिग्गजांनी उपस्थिती दर्शवली होती.
Considering the arrival of the summer season and the rising temperatures, starting today, Bhagwan Shri Ramlala will be wearing cotton vastra.
The vastra that Prabhu is wearing today, is made of handloom cotton malmal, dyed with natural indigo, and adorned with gotta flowers.… pic.twitter.com/BtDyzQXYgp
— Shri Ram Janmbhoomi Teerth Kshetra (@ShriRamTeerth) March 30, 2024
हेही वाचा:
अयोध्या : राम मंदिर जनतेसाठी खुले; भाविकांची पहाटेपासूनच गर्दी
PM मोदींनी हेलिकॅप्टरमधून शूट केला अयोध्या राम मंदिराचा व्हिडिओ
Jalgoan : अयोध्या सोहळ्यानिमित्त जैन इरिगेशनतर्फे शहरात आकर्षक सजावटीसह रोषणाई
Latest Marathi News उन्हाच्या झळा तीव्र..! अयोध्येतील राम मूर्तीला परिधान केला सुती पोशाख Brought to You By : Bharat Live News Media.