फूलशेती निर्यातीतून ३५२ कोटींचे परकीय चलन

कृषिप्रधान भारताला शेतमाल निर्यातीतून मोठ्या प्रमाणात परकीय चलन मिळते. केंद्र आणि राज्य सरकारमार्फत कृषिमाल निर्यातवृद्धीसाठी विविध योजना राबविण्यात येत आहेत. त्याचाच परिणाम म्हणून चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत (एप्रिल-सप्टेंबर २०२३) देशातून नऊ हजार ५२८ मेट्रिक टन फुले निर्यात होऊन देशाला ३५२ कोटी रुपयांचे परकीय चलन मिळाल्याचे अपेडाने प्रकाशित केलेल्या आकडेवारीवरून दिसत आहे. (Flower export) सणावाराच्या … The post फूलशेती निर्यातीतून ३५२ कोटींचे परकीय चलन appeared first on पुढारी.
#image_title

फूलशेती निर्यातीतून ३५२ कोटींचे परकीय चलन

लासलगाव: राकेश बोरा

कृषिप्रधान भारताला शेतमाल निर्यातीतून मोठ्या प्रमाणात परकीय चलन मिळते. केंद्र आणि राज्य सरकारमार्फत कृषिमाल निर्यातवृद्धीसाठी विविध योजना राबविण्यात येत आहेत. त्याचाच परिणाम म्हणून चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत (एप्रिल-सप्टेंबर २०२३) देशातून नऊ हजार ५२८ मेट्रिक टन फुले निर्यात होऊन देशाला ३५२ कोटी रुपयांचे परकीय चलन मिळाल्याचे अपेडाने प्रकाशित केलेल्या आकडेवारीवरून दिसत आहे. (Flower export)
सणावाराच्या पार्श्‍वभूमीवर देशात तसेच परदेशात मोठ्या प्रमाणात फुलांची मागणी असते. भारतातून यूएसए, नेदरलँड, ब्रिटन, कॅनडा, जर्मनी, मलेशिया, सिंगापूर, जपान, स्पेन आदी देशांत फुलांची मोठ्या प्रमाणात निर्यात होते. त्यातून देशाला परकीय चलनही मोठ्या प्रमाणात मिळते. (Flower export)
भारत सरकारने फूलशेतीला सूर्योदय उद्योग म्हणून दर्जा दिलेला आहे आणि त्याला १०० टक्के निर्यातभिमुख दर्जा दिला आहे. फुलांच्या बागलागवडीच्या मागणीत निरंतर वाढ होत असल्याने कृषी क्षेत्रातील तो एक महत्त्वाचा व्यावसायिक व्यवसाय झाला आहे. म्हणूनच व्यावसायिक फूलशेती ग्रीन हाउसच्या अंतर्गत हवामान नियंत्रित हाय-टेक अ‍ॅक्टिव्हिटी म्हणून उदयास आले आहे. 
फूलशेती निर्यात आकडेवारी (Flower export)
२०१९-२० – ५४१ कोटी
२०२०-२१ – ५७६ कोटी
२०२१-२२ – ७७१ कोटी
२०२२-२३ – ७०७ कोटी
फूलशेती निर्यातीत प्रचंड वाव: सचिन होळकर
फूलशेतीच्या निर्यातीतून गेल्या सहा महिन्यांमध्ये 352 कोटींचे परकीय चलन देशाला प्राप्त झाले ही बाब समाधानकारक असली तरी अजून फूलशेतीत आपल्या देशात खूप काही करण्यासारखे आहे. आजही जागतिक बाजारपेठेत भारताचा फूलशेतीचा वाटा हा अत्यंत नगण्य आहे. फूलशेतीचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी स्वतंत्र फूलशेती संशोधन केंद्र उभारून तिथून दर्जेदार रोपे विविध प्रकारच्या निर्यातक्षम जाती शेतकऱ्यांना उपलब्ध करून त्या प्रात्यक्षिक स्वरूपात शेतकऱ्यांना प्लॉटवर लावून दाखवाव्या लागतील. निर्यातक्षम फूलशेतीसाठी लागणाऱ्या सुविधा जास्तीत जास्त प्रमाणात उपलब्ध करून शेतकऱ्यांमध्ये याबाबत जागरूकता निर्माण करावी लागेल. फूलशेती हा शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वाचा विषय आहे त्यामुळे याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, असे मत कृषितज्ज्ञ सचिन होळकर यांनी व्यक्त केले आहे.
हेही वाचा :

Rajkumar Kohli passed away : ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक राजकुमार कोहली यांचे निधन
Nashik Crime : दारूच्या नशेत पत्नीचा खून, मारेकरी पतीला 12 तासांच्या आत अटक
Leopards Story : शिकार की नसबंदी, याबाबत मत-मतांतरे

The post फूलशेती निर्यातीतून ३५२ कोटींचे परकीय चलन appeared first on पुढारी.

कृषिप्रधान भारताला शेतमाल निर्यातीतून मोठ्या प्रमाणात परकीय चलन मिळते. केंद्र आणि राज्य सरकारमार्फत कृषिमाल निर्यातवृद्धीसाठी विविध योजना राबविण्यात येत आहेत. त्याचाच परिणाम म्हणून चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत (एप्रिल-सप्टेंबर २०२३) देशातून नऊ हजार ५२८ मेट्रिक टन फुले निर्यात होऊन देशाला ३५२ कोटी रुपयांचे परकीय चलन मिळाल्याचे अपेडाने प्रकाशित केलेल्या आकडेवारीवरून दिसत आहे. (Flower export) सणावाराच्या …

The post फूलशेती निर्यातीतून ३५२ कोटींचे परकीय चलन appeared first on पुढारी.

Go to Source