पुणे : शहरातील रस्ते ठरताय रात्रीस जीवघेणे!
पुणे : पुढारी वृत्तसेवा : शहरात रात्री अकरा ते पहाटे एक दरम्यानच्या काळात सार्वधिक जीवघेणे रस्ते अपघात घडल्याची माहिती समोर आली आहे. पुणे पोलिसांच्या 2022 च्या रोड क्रॅश डेटा विश्लेषणातून झालेल्या अपघाताची ही धक्कादायक माहिती आहे. त्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिस आणि जागतिक आरोग्य संस्थेच्या ‘व्हायटल स्टॅटेजीज’च्या तांत्रिक सहयोगाने वेगाने वाहने चालविणार्या वाहनचालकांना दुष्परिणामांबाबद्दल चेतावनी देणारी मोहीम सुरू करण्यात आली आहे.
21 नोव्हेंबरपासून चार आठवडे ही मोहीम राबविण्यात येणार आहे. शहरातील सर्व सिनेमागृहांत 30 सेकंदांची एक चित्रफीत दाखवण्यात येणार आहे. संजय नारकर यांनी आपला 24 वर्षांचा मुलगा रस्ते अपघातात गमावला आहे. याची सत्यकथा या चित्रफितीतून दाखवण्यात आली असून, नारकर वेगाने वाहन चालविण्याचे परिणाम आणि घरातील सदस्याच्या मृत्यूचे परिणाम सांगणार आहेत.
मध्यरात्रीची वेळ जीवघेणी
शहरात 2022 मध्ये अपघातात एकूण 327 जणांचा मृत्यू झाला. यामध्ये 75 मृत्यू हे रात्री 11 ते 1 च्या दरम्यान झालेल्या अपघात झाले आहेत. रात्रीच्या वेळी रस्ता रिकामा असताना अजाणतेपणाने वाहनांचा वेग वाढतो आणि त्यामुळे अपघात होत असल्याचे पुणे पोलिसांच्या 2022 च्या रोड क्रश डेटा विश्लेषणातून समोर आले आहे.
पाहा आकडे काय सांगतात
पुणे शहरातील अपघात : 2022
एकूण अपघात : 978
मृत्यू झालेले एकूण अपघात : 309
एकूण मृत्यू : 327
पादचारी मृत्यू : 106
दुचाकीस्वाराचा मृत्यू : 187
कार प्रवासी मृत्यू : 8
इतर मृत्यू : 26
रात्री 11 ते 1 मध्ये मृत्यू : 75
गेल्या काही वर्षांत रस्त्यावरील वाहनांचा वेग हा प्राणघातक आणि गंभीर दुखापतींसाठी कारण ठरत आहे. रस्ते अपघातात आलेला अचानक मृत्यू हे कुटुंबाला भावनिक आणि आर्थिकदृष्ट्या अपंग करत असतात.
– रितेश कुमार, पोलिस आयुक्त, पुणे शहर.
रिकामे रस्ते असतात तेव्हा वाहनांचा वेग वाढतो आणि अपघात होतात. यामुळे रस्ते अपघातात मृत्युमुखी पडणार्यांची संख्या वाढत आहे. या मोहिमेद्वारे वाहनांचा वेग कमी करण्याचे ध्येय आहे.
– विजयकुमार मगर, पोलिस उपायुक्त (वाहतूक)
हेही वाचा
Nashik Airport : दररोज १२ फ्लाइट; ९६० प्रवासी, २८ लाखांची उलाढाल
नाशिकच्या घुगे दाम्पत्याला मिळाले वारीचे फळ
Crime News : पत्ता विचारणे पडले महागात, चाकूचा धाक दाखवून लुट
The post पुणे : शहरातील रस्ते ठरताय रात्रीस जीवघेणे! appeared first on पुढारी.
पुणे : पुढारी वृत्तसेवा : शहरात रात्री अकरा ते पहाटे एक दरम्यानच्या काळात सार्वधिक जीवघेणे रस्ते अपघात घडल्याची माहिती समोर आली आहे. पुणे पोलिसांच्या 2022 च्या रोड क्रॅश डेटा विश्लेषणातून झालेल्या अपघाताची ही धक्कादायक माहिती आहे. त्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिस आणि जागतिक आरोग्य संस्थेच्या ‘व्हायटल स्टॅटेजीज’च्या तांत्रिक सहयोगाने वेगाने वाहने चालविणार्या वाहनचालकांना दुष्परिणामांबाबद्दल चेतावनी देणारी …
The post पुणे : शहरातील रस्ते ठरताय रात्रीस जीवघेणे! appeared first on पुढारी.