मुंबई : आंबेडकरी चळवळीतील सामाजिक कार्यकर्त्या मैनाताई गायकवाड यांचे निधन
मालाड; पुढारी वृत्तसेवा आंबेडकरी चळवळीतील जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या, भारिप बहुजन महासंघाच्या वरिष्ठ कार्यकर्त्या, मालाड (पु) कुरार व्हिलेज येथील झुंजार व्यक्तिमत्व मैनाताई गायकवाड यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. मृत्यूसमयी त्या 72 वर्षांच्या होत्या.
मैनाताई गायकवाड यांनी अनेक आंदोलनात अग्रणी सहभाग घेतला होता. बाळासाहेब आंबेडकरांच्या त्या कट्टर समर्थक होत्या. आंबेडकरी चळवळीशी समर्पित जीवन त्या जगल्या. कुरार मधील कोणत्याही कार्यक्रमाला त्यांचे योगदान असायचे.
त्यांचा सर्वच आंबेडकरी राजकीय पक्षांशी तसेच संघटनांशी जवळचा संबंध होता. त्यांच्या जाण्याने एक चळवळीतील हरहुन्नरी व्यक्तिमत्व हरपल्याची प्रतिक्रिया बौद्ध समाजातून व्यक्त केली जात आहे. मैनाताई गायकवाड यांच्यामागे पती, दोन मुले, एक मुलगी, सुना नातवंडे असा परिवार आहे.
हेही वाचा :
Raju Shetti Kolhapur: बेकायदेशीररित्या महामार्ग रोखल्याने राजू शेट्टींसह २ हजार जणांवर गुन्हा
भारताला मोठा दिलासा : 8 माजी नौदल अधिकाऱ्यांच्या फाशीविरोधातील अपील कतारने स्वीकारले
Mohan Bhagwat | “जग हे एक कुटुंब, आम्ही सर्वांना ‘आर्य’ बनवू : मोहन भागवत
The post मुंबई : आंबेडकरी चळवळीतील सामाजिक कार्यकर्त्या मैनाताई गायकवाड यांचे निधन appeared first on पुढारी.
मालाड; पुढारी वृत्तसेवा आंबेडकरी चळवळीतील जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या, भारिप बहुजन महासंघाच्या वरिष्ठ कार्यकर्त्या, मालाड (पु) कुरार व्हिलेज येथील झुंजार व्यक्तिमत्व मैनाताई गायकवाड यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. मृत्यूसमयी त्या 72 वर्षांच्या होत्या. मैनाताई गायकवाड यांनी अनेक आंदोलनात अग्रणी सहभाग घेतला होता. बाळासाहेब आंबेडकरांच्या त्या कट्टर समर्थक होत्या. आंबेडकरी चळवळीशी समर्पित जीवन त्या जगल्या. कुरार मधील …
The post मुंबई : आंबेडकरी चळवळीतील सामाजिक कार्यकर्त्या मैनाताई गायकवाड यांचे निधन appeared first on पुढारी.