मुंबईत केला खून; ४०० कि.मी.वरील मुमेवाडी घाटात मृतदेह जाळण्यापूर्वीच महिलेला पकडले

उत्तूर, पुढारी वृत्तसेवा : मुमेवाडी (ता. आजरा) येथील घाटानजीकच्या शेतात गजेंद्र सुभाष बांडे (रा. खैरी प्लांट, जित्तूर, जि. परभणी) यांचा मृतदेह जाळण्याचा प्रयत्न करणार्‍या सुनीता सुभाष देवकाई (सध्या रा. खोपोली, जि. रायगड, मूळ गाव हसूरसासगिरी, ता. गडहिंग्लज) हिला अटक करण्यात आली. गुरुवारी (दि. 28) रात्री 11 वाजता आजरा पोलिसांची गस्त सुरू असताना या महिलेला रंगेहाथ … The post मुंबईत केला खून; ४०० कि.मी.वरील मुमेवाडी घाटात मृतदेह जाळण्यापूर्वीच महिलेला पकडले appeared first on पुढारी.

मुंबईत केला खून; ४०० कि.मी.वरील मुमेवाडी घाटात मृतदेह जाळण्यापूर्वीच महिलेला पकडले

उत्तूर, Bharat Live News Media वृत्तसेवा : मुमेवाडी (ता. आजरा) येथील घाटानजीकच्या शेतात गजेंद्र सुभाष बांडे (रा. खैरी प्लांट, जित्तूर, जि. परभणी) यांचा मृतदेह जाळण्याचा प्रयत्न करणार्‍या सुनीता सुभाष देवकाई (सध्या रा. खोपोली, जि. रायगड, मूळ गाव हसूरसासगिरी, ता. गडहिंग्लज) हिला अटक करण्यात आली.
गुरुवारी (दि. 28) रात्री 11 वाजता आजरा पोलिसांची गस्त सुरू असताना या महिलेला रंगेहाथ पकडल्यानंतर खुनाला वाचा फुटली. धक्कादायक म्हणजे, या महिलेने साथीदारांसह वाहनातून खोपोली ते मुमेवाडी असा 400 कि.मी.चा प्रवास मृतदेहासोबतच केला.
याबाबत माहिती अशी, पोलिसांचे पथक गस्तीवर असताना मुमेवाडी घाटात चारचाकी थांबल्याचे आढळले. चालकाकडे चौकशी केली असता आपल्यासोबतची महिला शौचास गेल्याचे त्याने सांगितले. इतक्या रात्री एकटी महिला घाट परिसरात शौचास कशी जाईल, याबाबतची शंका आल्याने पोलिसांनी त्या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करताच चालकाने चारचाकीसह धूम ठोकली. हा प्रकार लक्षात येताच पोलिसांचा संशय बळावला. त्यांनी महिला गेलेल्या ठिकाणी पाहिले असता तेथे एक मोठी प्रवासी बॅग व बाजूला पेट्रोलच्या बाटल्या दिसून आल्या. महिलेला याबाबत विचारणा केली असता उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलिसांनी तिला ताब्यात घेतल्यानंतर तिने संपूर्ण हकीकत सांगितली. तिने थेट खुनाचीच कबुली दिली.
सुनीता देवकाई व गजेंद्र यांच्यात दोन वर्षांपासून अनैतिक संबंध होते. गजेंद्रने लग्नाचे आमिष दाखवून सुनीताकडून पैसेही उकळले होते. वारंवार विचारणा करूनही तो लग्नास टाळाटाळ करत होता. याचाच राग सुनीताच्या मनात होता. यातून तिने गजेंद्रचा काटा काढण्याचे ठरवले. आठवडाभरात तिच्या डोक्यात सातत्याने हेच विचार येत होते.
दि. 27 मार्च रोजी गजेंद्रला तिने खोपोली येथील भाडोत्री घरात बोलावले. त्याला झोपेच्या गोळ्या दिल्या. त्यानंतर अमित पोटे (रा. सुळे, ता. आजरा) याच्या मदतीने गळा आवळून खून केला. दुसर्‍या दिवशी सकाळी सुनीताने ही घटना तिचा मुलगा सूरजला सांगितल्यानंतर या तिघांनीही मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचे नियोजन केले. यानुसार मोठी प्रवासी बॅग घेऊन त्यामध्ये गजेंद्रचा मृतदेह कोंबला. त्याच्या अंगावर केवळ अंतर्वस्त्रे ठेवली, तर वरील बाजू त्याच्याच कपड्यांद्वारे झाकण्याचा प्रयत्न केला.
अमित याने चारचाकी भाडोत्री घेऊन मृतदेह असलेली बॅग गाडीमध्ये घालून तब्बल 400 कि.मी.चा प्रवास केला. रात्री कागलजवळ एका लॉजमध्ये मुक्काम करणार असल्याचे सांगून त्या ठिकाणी चालकाला थांबवले, तर अमित व सुनीता हे दोघेही मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी चारचाकी घेऊन आजर्‍याच्या दिशेने निघाले. वाटेतील एका शेतातून हरभर्‍याचा पाला तसेच एका पेट्रोल पंपावर पेट्रोलच्या चार बाटल्या मृतदेह पेटवण्यासाठी घेतल्या. मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी योग्य जागा शोधत असताना मुमेवाडी घाटात निर्जनस्थळ दिसताच सुनीताने गाडी थांबवण्यास सांगितली. जागेची पाहणी करून मृतदेह असलेली बॅग व पेट्रोलच्या बाटल्या घेऊन गेली. अमित चारचाकीजवळ बसून असतानाच आजरा पोलिसांची पेट्रोलिंग करणारी गाडी आली अन् या सुनीताचे कृष्णकृत्य उघडे पडले.
पोलिस अंमलदार बाजीराव कांबळे यांनी घटनास्थळी मृतदेह असल्याची खात्री होताच स.पो.नि. नागेश यमगर व पोलिस उपअधीक्षक रामदास इंगवले यांना माहिती दिली. हे दोघेही घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवला, तर सुनीता हिला पोलिसांनी ताब्यात घेत पळून गेलेल्या अमित व मुलाच्या शोधासाठी पथके पाठवली.
पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित, अप्पर पोलिस अधिकारी नितेश खाटमोडे, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे रवींद्र कळमकर यांनी पुढील कारवाईचे नियोजन केले. पेट्रोलिंग पथकासह संजय पाटील, दत्तात्रय शिंदे, संदीप मसवेकर, संतोष घस्ती, सुदर्शन कांबळे, दीपक किल्लेदार, राजेंद्र पाटील, होमगार्ड सतीश खोत, रोहित दळवी यांच्या पथकाने सर्व कारवाई पार पाडली.
Latest Marathi News मुंबईत केला खून; ४०० कि.मी.वरील मुमेवाडी घाटात मृतदेह जाळण्यापूर्वीच महिलेला पकडले Brought to You By : Bharat Live News Media.