एक तोळा सोन्याचा दर ७० हजार पार

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : गेल्या काही दिवसापासून सोन्याच्या दरात सुरू असलेल्या वाढीचे सातत्य आजही कायम राहिले शुक्रवार, दि. 29 रोजी सोने दराने पूर्वीचे सर्व उच्चांक मोडीत काढले. 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा जीएसटीसह दर 70200 रुपयांवर गेला आहे. चांदीचा दर काहीसा स्थिर राहिला असून, चांदी 76,500 रुपये प्रतिकिलो दराने विकली जात आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या … The post एक तोळा सोन्याचा दर ७० हजार पार appeared first on पुढारी.

एक तोळा सोन्याचा दर ७० हजार पार

कोल्हापूर, Bharat Live News Media वृत्तसेवा : गेल्या काही दिवसापासून सोन्याच्या दरात सुरू असलेल्या वाढीचे सातत्य आजही कायम राहिले शुक्रवार, दि. 29 रोजी सोने दराने पूर्वीचे सर्व उच्चांक मोडीत काढले. 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा जीएसटीसह दर 70200 रुपयांवर गेला आहे. चांदीचा दर काहीसा स्थिर राहिला असून, चांदी 76,500 रुपये प्रतिकिलो दराने विकली जात आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या दरात होत असलेला चढ-उतार आणि अमेरिकेतील व्याजदर वाढण्याची शक्यता आणि डॉलरच्या तुलनेत रुपया कमकुवत होणे ही यामागील कारणे आहेत. लग्नसराईच्या हंगामात सोन्याची मागणी वाढत असल्यामुळे दरात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. पुढील काळात दरात आणखी वाढ होण्याची शक्यता असल्याने सोने खरेदीकडे लोकांचा कल अद्याप कायम आहे. गुढीपाडव्याच्या मुहूर्ताच्या खरेदीच्या वेळी त्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.
गुरुवार दि. 28 च्या तुलनेत चांदीचे दर स्थिर राहिले. दरात होत असलेली वाढ ही गुंतवणुकीसाठी चांदीची मागणी वाढल्यामुळे आहे. गुढीपाडव्याचा मुहूर्त आणि लग्नसराईत होणारी सोने खरेदी यावर भाववाढीचे सावट असले तरी भाववाढीचा ट्रेंड आणखी काही दिवस राहण्याची शक्यता असल्याने खरेदीदारांमध्ये उत्साह कायम राहील, असा अंदाज शहरातील सराफांनी व्यक्त केला आहे.
Latest Marathi News एक तोळा सोन्याचा दर ७० हजार पार Brought to You By : Bharat Live News Media.