महापालिकेस शासकीय संस्थांचा जाच; 275 कोटी पाणीपट्टी थकीत

पुणे : पुढारी वृत्तसेवा : महापालिकेची थकीत पाणीपट्टी 794 कोटी 56 लाख रुपयांवर पोहचली असून, हद्दीतील व हद्दीलगतच्या विविध शासकीय संस्थांकडे पाणीपुरवठा विभागाची 275 कोटी रुपये पाणीपट्टी थकीत आहे. ही थकबाकी वसूल होण्यासाठी पाणीपुरवठा विभागाकडून या संस्थांना नोटीस देण्यात आल्या असून, 155 कोटी पाणीपट्टी जमा झाली आहे. महापालिका हद्दीतील विविध शासकीय कार्यालये तसेच पुणे व … The post महापालिकेस शासकीय संस्थांचा जाच; 275 कोटी पाणीपट्टी थकीत appeared first on पुढारी.

महापालिकेस शासकीय संस्थांचा जाच; 275 कोटी पाणीपट्टी थकीत

पुणे : Bharat Live News Media वृत्तसेवा : महापालिकेची थकीत पाणीपट्टी 794 कोटी 56 लाख रुपयांवर पोहचली असून, हद्दीतील व हद्दीलगतच्या विविध शासकीय संस्थांकडे पाणीपुरवठा विभागाची 275 कोटी रुपये पाणीपट्टी थकीत आहे. ही थकबाकी वसूल होण्यासाठी पाणीपुरवठा विभागाकडून या संस्थांना नोटीस देण्यात आल्या असून, 155 कोटी पाणीपट्टी जमा झाली आहे. महापालिका हद्दीतील विविध शासकीय कार्यालये तसेच पुणे व खडकी कॅन्टोन्मेंटकडे मोठ्या प्रमाणात पाणीपट्टी थकलेली आहे. पुणे पोलिसांकडे 3 कोटी रुपये पाणीपट्टी असून, यापैकी 1 कोटी रुपये पाणीपट्टीचे वळते करून घेण्यात आले आहेत.
तर, पुणे कॅन्टोन्मेंटकडून त्यांच्याकडे असलेल्या 55 कोटी रुपयांच्या थकबाकीपैकी 1 कोटी रुपये नुकतेच जमा झाले असून, खडकी कॅन्टोन्मेंटकडे अद्यापही 14 कोटींची थकबाकी आहे. दरम्यान, पुणे महापालिका हद्दीत समाविष्ट झालेल्या गावांमधील ग्रामपंचायतींकडून सुमारे 50 कोटी रुपयांची थकबाकी येणे बाकी असून, ती मिळविण्यासाठी प्रयत्न चालू असल्याचेही महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता नंदकुमार जगताप यांनी सांगितले. दरम्यान, पाणीपुरवठा विभागाकडे 28 मार्चपर्यंत 138 कोटी 88 लाख पाणीपट्टी जमा झाली आहे.
हेही वाचा

विनाअनुदानित महाविद्यालयाची ‘नॅक’कडे पाठ!
खा. संजय मंडलिक यांनी घेतली डॉ. प्रतापसिंह जाधव यांची भेट
Pune : महापालिकेच्या तिजोरीत 7463 कोटी जमा..

Latest Marathi News महापालिकेस शासकीय संस्थांचा जाच; 275 कोटी पाणीपट्टी थकीत Brought to You By : Bharat Live News Media.